Video : किणी टोलनाक्यावर गौतमी पाटीलचा ‘धुरंधर’ डान्स, पाहणारे पाहत राहिले…
अरररर खतरनाक, मोकळे केस, काळा गॉगल, गौतमी पाटीलचा 'धुरंधर' डान्स. व्हिडीओ बघतच राहाल. सोशल मीडियावर होतेय प्रचंड चर्चा.

Gautami Patil Dance Video : गेल्या अनेक दिवसांपासून ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. यामधील अक्षय खन्नाचा डान्स प्रचंड चर्चेत आला होता. अनेकांना त्यावर रील्स बनवल्या तसेच काहींनी तर AI चा वापर करून अक्षय खन्ना सारखा लूक देखील तयार केला. अनेकजण तर ‘धुरंधर’ चित्रपट नाही तर फक्त अक्षय खन्नाच्या या गाण्यावरील स्टेप्स पाहण्यासाठी तिकीट काढून गेले.
दरम्यान, या चित्रपटाने ज्याप्रकारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्याच प्रमाणे या चित्रपटातील अक्षय खन्नाचे डान्सचे देखील मोठ्या प्रमाणात अनेक निर्माते, बॉलिवूडमधील कलाकार तसेच इतर लोकांनी देखील कौतुक केले. मात्र, यामध्ये अख्या महाराष्ट्राला आपल्या डान्सने वेड लावणारी सबसे कातिल गौतमी पाटील देखील अक्षय खन्नाची चाहती झाली आहे. तिने देखील ‘धुरंधर’ मधील अक्षय खन्नाच्या गाण्यावर ठेका धरला आहे.
गौतमी पाटीलने तिचा हा डान्स करतानाचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा डान्स पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. त्यासोबत तिने ज्या टोलनाक्यावर हा डान्स व्हिडीओ शूट केला त्यावर देखील चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. सर्वात खास गोष्ट म्हणजे गौतमीनं Fa9la गाण्यावर अक्षय खन्नाची प्रसिद्ध हुक स्टेप कॉपी करत डान्स केला आहे. मोकळे केस, काळा गॉगल आणि तिचा हटके डान्स सध्या चर्चेत आला आहे. गौतमीचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.
Instagram पर यह पोस्ट देखें
चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
गौतमी पाटीलचा हा डान्स व्हिडीओ पाहून चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने ‘मस्त हा मस्त’ अशी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे, तर दुसऱ्याने ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ असं म्हणत तिच्या डान्स स्टाईलचं वर्णन केलं आहे. काही चाहत्यांनी ‘परफेक्ट…’, ‘खूप छान…’, ‘फायर डान्स’ अशा प्रतिक्रिया देत व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
एकंदरीत, ‘धुरंधर’ चित्रपटातील Fa9la गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, अक्षय खन्नासोबतच गौतमी पाटीलही या ट्रेंडमुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या चित्रपटाची अद्याप बॉक्स ऑफिसवर कमाई सुरुच आहे. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
