कार्यक्रम रंगात आलेला असतानाच फॅन्सने थेट बंदूक रोखली; पंकज उधास यांच्या मैफिलीत काय घडलं होतं?

Ghazal Singer Pankaj Udhas Passes Away : पंकज उधास यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. पंकज उधास यांच्या मुलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत निधनाची बातमी शेअर केली. गेल्या काही दिवसांपासून पंकज उधास यांच्यावर उपचार सुरू होते. 72 व्या वर्षी पंकज उधास यांनी शेवटचा श्वास घेतला.

कार्यक्रम रंगात आलेला असतानाच फॅन्सने थेट बंदूक रोखली; पंकज उधास यांच्या मैफिलीत काय घडलं होतं?
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 7:27 PM

मुंबई : प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पंकज उधास यांच्या निधनाबद्दल त्यांच्या मुलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली. 72 व्या वर्षी पंकज उधास यांनी शेवटचा श्वास घेतला. पंकज उधास यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली. चिट्ठी आई है आई है… पंकज उधास यांचे सर्वात गाजलेले गाणे आहे. पंकज उधास यांच्या जाण्याने देश एका मोठ्या गायकाला मुकला आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत पंकज उधास यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त केले आहे. पंकज उधास यांचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे.

पंकज उधास यांच्या लाईव्ह कार्यक्रमाला चाहत्यांची मोठी गर्दी ही कायमच बघायला मिळायची. हेच नाही तर पंकज उधास यांचे एक चॅनल देखील होते. या चॅनलच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात कायमच असायचे. आपल्या गाण्याची झलक ते त्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत. हे चॅनल चाहते मोठ्या प्रमाणात फाॅलो देखील करत.

एका मुलाखतीवेळी पंकज उधास यांनी एक मोठा किस्सा सांगितला होता. थेट त्याच्यावर बंदूक रोखण्यात आली होती. पंकज उधास म्हणाले होते की, एका लॉन्ग कॉन्सर्टमध्ये एक व्यक्ती माझ्याकडे आली. त्याने मला फलां-फलां गझल म्हणण्यास सांगितले. त्यावेळी मी त्या व्यक्तीला थेट म्हणालो की, मी तुझा गुलाम नाहीये, जे तू सांगितले ते गायला.

पंकज उधास म्हणाले, मुळात त्या व्यक्तीचा व्यवहार हा अजिबातच चांगला नव्हता. मी त्याला त्याने सांगितलेली गझल म्हणण्यास नकार दिल्यावर त्याने थेट त्याच्या खिशात हात घातला आणि थेट बंदूक काढली. त्यानंतर त्याने ती बंदूक माझ्या डोक्यावर लावली आणि गझल म्हणण्यास सांगितले. तो माझ्यासमोर बंदूक रोखली उभाच राहिला.

इच्छा नसताना देखील मला गझल म्हणावी लागली. या प्रकारावेळी स्वत: ला खूप जास्त मजबूर समज होतो. या प्रकारानंतर मी थेट घरी गेलो. हा किस्सा सांगताना पंकज उधास हे म्हणाले की, हा किस्सा 20 ते 25 वर्षे जुना आहे. कोणाला तरी विश्वास बसेल का की, इतक्या मोठ्या कलाकारासोबत असा हैराण करणारा प्रकार घडू शकतो. मात्र, याबद्दल स्वत: पंकज उधास यांनी सांगितले होते.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....