Girija Oak : ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे गिरीजा ओकची नणंद, भाडिपाशी खास नातं, सासरे प्रसिद्ध दिग्दर्शक
अभिनेत्री गिरीजा ओक सध्या तिच्या निळ्या साडीतील लूकमुळे 'नॅशनल क्रश' बनली आहे. सोशल मीडियावर तिची सर्वत्र चर्चा आहे. तिचे वय, काम आणि कौटुंबिक जीवनाबद्दल लोकांना उत्सुकता आहे. प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची कन्या असलेल्या गिरीजाने मराठी-हिंदी चित्रपटांसह अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या सासरचेही मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहेत.

निळ्या साडीमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) सध्या सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. तिने नुकतीच एक मुलाखत दिली आणि तेव्हापासूनच ही मराठमोळी अभिनेत्री देशभर गाजत आहे. तिची साडी,लूक, सौंदर्य आणि हास्य यावर लोक फिदा झाले असून रातोरात ती ‘नॅशनल क्रश’आहे.सोशल मीडियावरही सगळीकडे तिचीच चर्चा असून तिच्याबद्दल सगळं काही जाणून घेण्याची लोकांना खूप उत्सुकता आहे. तिचं वय, तिचं काम, तिच्य़ा घरी कोण कोम, नवरा काय करतो अशा सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची माहित मिळवण्याची नेटकऱ्यांना इच्छा असून तिचे फोटोही बरेच व्हायरल झाले आहेत.
मराठमोळी अभिनेत्री असलेल्या गिरीजाबद्दल मराठी प्रेक्षकांना तर माहीत आहेत. पण तिचं वैयक्तिक आयुष्य़, घर, कुटुंब याबद्दल बऱ्याच लोकांना कदाचित महीत नसेल. विख्यात अभिनेते गिरीश ओक यांची ती कन्या असून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन तिने मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं. मानिनीमधून मोठ्या पडद्यावर आलेल्या गिरीजाने मराठी तसेच अनेक हिंदी चित्रपट , टीव्ही मालिका, नाटकं यातही काम केलं आहे. बऱ्याच लोकांना कदाचित माहीत नसेल पण गिरीजाच्या सासरचेही मनोरंजन, चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत. सासरे नामवंत निर्माते-दिग्दर्शक, सासू प्रसिद्ध कॉश्च्युम डिझायनर तर तिची नणंद ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
नणंद प्रसिद्ध अभिनेत्री, सासू-सासरेही मनोरंजन क्षेत्राशी निगडीत
प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, लेखक , अभिनेते श्रीरंग गोडबोले हे गिरीजाचे सासरे आहेत. तर तिची सासू ही कॉश्च्युम डिझायनर आहे. गिरीजने 2011 साली सुहृद गोडबोले याच्याशी लग्न केलं, त्या दोघांना एक मुलगाही आहे. तर गिरीजाप्रमाणेच तिची नणंद हीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री असून मृण्मयी गोडबोले असं तिचं नावं आहे. चि.व चि.सौ.का या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलेल्या मृण्मयीने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. भाडिपाच्या आई आणि मी च्या अनेक व्हिडीओजमध्ये ती जुईच्या भूमिकेत दिसली आहे. गिरीजा आणि मृण्मयीचा बाँड खूप खास असून ती बऱ्याचदा सोशल मीडियावर तिच्यासोबतचे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असते.
गिरीजा ती अनेक जाहिरातींमध्ये दिसली आहे. तसेच तिने अनेक हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. ‘तारे जमीन पर’, ‘शोर इन द सिटी’ या व्यतिरिक्त ‘जवान’ (2023) मध्येही ती खास भूमिकेत दिसली होती. तर काही महिन्यांपूर्वी ओटीटीवर रिलीज झालेल्या ‘झेंडे’ चित्रपटातही तिची महत्वाची भूमिका होती. यामध्ये तिने इ.झेंडें यांच्या पत्नीची भूमिका साकारली. मनोज वायपेयी हे या चित्रपटात इन्स्पेक्टर झेंडेच्या भूमिकेत होते.
