AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमानच्या ऑनस्क्रीन बहिणीवर गोविंदाचं आकंठ प्रेम; तिच्यासाठी साखरपुडाही मोडला पण..

फोटोत दिसणारी तरुणी 90 च्या दशकातील कोणती अभिनेत्री आहे, हे तुम्ही ओळखू शकाल का? तिच्याबाबत हिंट द्यायची झाल्यास, गोविंदाचं तिच्यावर प्रेम जडलं होतं. तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने साखरपुडासुद्धा मोडला होता. मात्र या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही.

सलमानच्या ऑनस्क्रीन बहिणीवर गोविंदाचं आकंठ प्रेम; तिच्यासाठी साखरपुडाही मोडला पण..
या अभिनेत्रीला ओळखलंत का?Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 21, 2023 | 1:49 PM
Share

मुंबई | 21 ऑक्टोबर 2023 : फोटोमधल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का? एका सुपरहिट चित्रपटात तिने अभिनेता सलमान खानच्या बहिणीची भूमिका साकारली होती. 80-90 च्या दशकात या अभिनेत्रीने अनेक दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. काही दिवसांपूर्वी ती नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या सीरिजमध्येही झळकली होती. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही ती यामध्ये अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये दिसली होती. ही अभिनेत्री आता 53 वर्षांची असून अजूनही तिचं सौंदर्य तरुण अभिनेत्रींना टक्कर देणारं आहे.

अजूनही तुम्ही या अभिनेत्रीला ओळखू शकलात नाही तर आम्ही सांगतो. या अभिनेत्रीचं नाव आहे नीलम कोठारी. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतच ती एक ज्वेलरी डिझायनरसुद्धा आहे. नीलमने फार कमी वयात टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. 1984 मध्ये ती ‘जवानी’ या चित्रपटात सनमच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘घर का चिराग’ या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. यामध्ये ती अभिनेता चंकी पांडेसोबत रोमान्स करताना दिसली होती. याशिवाय नीलमने ‘अग्निपथ’, ‘सिंदूर’, ‘हत्या’, ‘अफसाना’, ‘हम साथ साथ है’, ‘दूध का कर्ज’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं.

View this post on Instagram

A post shared by Neelam (@neelamkotharisoni)

नीलम तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे बरीच चर्चेत होती. तिचं नाव बॉलिवूडचा हँडसम हंक बॉबी देओलपासून गोविंदापर्यंत जोडलं गेलं होतं. मात्र या दोघांशीही तिचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. एकेकाळी बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा नीलमच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. नीलमशी लग्न करण्यासाठी गोविंदाने त्याचा साखरपुडासुद्धा मोडला होता. मात्र काही कारणास्तव या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. गोविंदाच्या आईला नीलमसोबतचं त्याचं नातं पसंत नव्हतं असं म्हटलं जातं. तर धर्मेंद्र यांनीसुद्धा तिला आपली सून होऊ दिलं नव्हतं.

नीलमने 2000 मध्ये ऋषी सेठियाशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर 2011 मध्ये तिने टीव्ही अभिनेता समीर सोनीशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे. नीलम ही बिझनेस वुमनसुद्धा आहे. ती ज्वेलरी डिझायनिंगचं काम करते.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.