AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चकार शब्द न काढल्याबद्दल तिचे आभार; मराठी अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान गोविंदा स्पष्टच बोलला

Govinda : अभिनेत्री कोमलसोबत गोविंदाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून पुन्हा एकदा अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. एका मुलाखतीत खुद्द गोविंदाने यावर प्रतिक्रिया दिली होती. अभिनेत्रीचे त्याने आभार मानले होते.

चकार शब्द न काढल्याबद्दल तिचे आभार; मराठी अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान गोविंदा स्पष्टच बोलला
गोविंदा, सुनिता अहुजा, कोमल राणी स्वर्णकारImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 10, 2026 | 9:21 AM
Share

एका अभिनेत्रीसोबत एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अभिनेता गोविंदाचं खासगी आयुष्य तुफान चर्चेत आहे. गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने अनेकदा त्याच्यावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे आरोप केले आहेत. अफेअरच्या चर्चांदरम्यान गोविंदाला अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबत एअरपोर्टवर पाहिलं गेलं. विशेष म्हणजे सुनिताने एका मुलाखतीत कोमलचा अप्रत्यक्षपणे उल्लेखसुद्धा केला होता. कोमल या नावाचा मला प्रचंड तिरस्कार आहे, असं तिने म्हटलं होतं. या व्हायरल व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर आता गोविंदाची एक प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. अफेअरच्या चर्चांबद्दल प्रतिक्रिया देताना गोविंदाने संबंधित अभिनेत्रीचे आभार मानले होते. “अशा गोष्टींमुळे वृत्तांमध्ये येऊनही तिने चकार शब्द न काढल्याबद्दल मी तिचे आभार मानतो”, असं गोविंदाने म्हटलं होतं.

काय म्हणालेला गोविंदा?

पत्नी सुनिताने केलेल्या फसवणुकीच्या आरोपांवर गोविंदा म्हणाला, “माझ्यावर कधी आरोप लागले नाहीत? जी व्यक्ती आरोप करतेय, ती माझं बालपणीचं प्रेम आहे. प्रेमाच्या बाबतीत, ते कधीच नीट जमलं नाही. आता हे प्रेम कोणाच्या तरी विचारानुसार म्हातारपणाचं झालं आहे. बैलाचा आयुष्यभर वापर झाल्यावर त्याला कत्तलखान्यात पाठवलं जातं. मी चार सुपरस्टार्स, मिस युनिव्हर्स हिरोइनसोबत काम केलंय. मी कधीच त्यांच्याकडे पाहिलंसुद्धा नाही. माझी एकही हिरोइन माझ्याबद्दल अशी तक्रार करू शकत नाही की मी तिला त्रास दिला असेन किंवा तिच्याबद्दल अपशब्द वापरले असतील. त्यामुळे माझ्या घरी जी हिरोइन येत आहे आणि जी माझ्या प्रॉडक्शन अंतर्गत करिअरची सुरुवात करत आहे, तिच्यासोबत मी कधीच काही चुकीचं करणार नाही.”

अभिनेत्रीसोबत गोविंदाचा व्हिडीओ

कोमलचे मानले आभार

“माझी आईसुद्धा हिरोइन होती आणि मी कधीच कोणत्या हिरोइनसोबत गैरवर्तन केलं नाही. आता ती थेट नाव घेऊन बोलत आहे आणि मला असे शब्द आवडत नाहीत. त्यामुळे मी नवोदित अभिनेत्रींची माफी मागतो. या आरोपांनंतर कदाचित ते माझ्यासोबत काम करताना घाबरतील. सुनिताने ज्या कोमलचं नाव घेतलं आहे, मी तिचे आभार मानतो. ती गप्प आहे, एकही शब्द बोलत नाहीये, यासाठी मी तिचे आभार मानतो. कारण आजकालच्या तरुण अभिनेत्री थेट शिवीगाळ करतात. मी खासकरून कोमलचे आभार मानतो, कारण अशा पद्धतीने बातम्यांमध्ये येऊनही तिने चकार शब्द काढला नाही. अशा घटनांचा वापर करून प्रसिद्धीच्या झोतात येणाऱ्यांपैकी ती नाही”, असं गोविंदाने स्पष्ट केलं होतं.

‘मिस मालिनी’ला दिलेल्या मुलाखतीत सुनिताने आरोप केले होते, “तारुण्यात चुका होतात, पण वयाच्या 63 व्या वर्षी हे सर्व ऐकणं योग्य वाटत नाही.” यानंतर जेव्हा मुलाखतकर्त्याने ‘कोमल’ असं नाव घेतलं, तेव्हा सुनिता पुढे म्हणाली, “या नावातच जरा गडबड आहे. मला कोमल या नावाचा खूप तिरस्कार आहे. एक आहे कोमल… XYZ कोणीतरी.. मला तिचा खूप तिरस्कार आहे.”

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी