हद कर दी आपने..; लहान मुलीसोबत गोविंदाचं असं वागणं पाहून वैतागले नेटकरी
सोशल मीडियावर अभिनेता गोविंदाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे, ते जाणून घेऊयात..

अभिनेता गोविंदाचा नवीन लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. गोविंदाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत स्वत:चा नवीन लूक नेटकऱ्यांना दाखवला आहे. यासोबतच गोविंदाचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला आहे, जो विमानप्रवासादरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये गोविंदा विमानात बसलेला दिसत असून त्याच्या बाजूला एक लहान मुलगी आहे. या लहान मुलीसोबत गोविंदा ज्याप्रकारे वागतो, ते पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींना गोविंदाचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही.
या व्हिडीओमध्ये गोविंदा विमानात एका छोट्या मुलीच्या बाजूला बसल्याचं दिसत आहे. प्रवासादरम्यान तो त्या मुलीसोबत सेल्फी व्हिडीओ रेकॉर्ड करतोय आणि मधेच तो तिच्या खांद्यावर डोकं ठेवतो. यावेळी ती मुलीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पहायला मिळत आहे. गोविंदा नेमकं काय करतोय, हे तिलाही कळत नाही, पण तरीही ही त्याच्याकडे पाहून हसते. यानंतर गोविंदासुद्धा कॅमेरामध्ये पाहून हसतो. जरी गोविंदा त्या मुलीसोबत खेळण्याचा प्रयत्न करत असला तरी काहींना त्याचं हे वागणं अजिबात पटलं नाही.
Govinda in a flight byu/DyausPater inBollyBlindsNGossip
‘गोविंदा नेमकं काय करतोय, तो असा का वागतोय’, असा सवाल एकाने केला. तर ‘ही छोटी मुलगी कोण आहे? ती रवीनासारखी का दिसतेय’, असा प्रश्न दुसऱ्या युजरने विचारला आहे. ‘हे खूपच विचित्र वागणं आहे, याची बायको बरोबर बोलते’, असंही काहींनी लिहिलं आहे. ‘हद कर दी आपने’ अशी कमेंट एकाने केली. हे गोविंदाच्या एका चित्रपटाचंही नाव आहे. विमानात गोविंदाच्या बाजूला बसलेली ती मुलगी त्याच्याच टीममधील होती का, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.
गोविंदा गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं म्हटलं गेलं होतं. परंतु नंतर या दोघांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याची माहिती त्याच्या मॅनेजरने दिली. यादरम्यान सुनितासुद्धा विविध मुलाखतींमध्ये गोविंदासोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. गोविंदासोबत एकाच घरात न राहण्याच्या चर्चांवरही तिने प्रतिक्रिया दिली होती.
