गोविंदा जेव्हा लहान मुलासोबत… प्रेक्षकांनी वाजवल्या टाळ्या अन् शिट्ट्या, गोविंदाचा तो व्हिडीओ होतोय व्हायरल
गोविंदाचा एका लहान मुलासोबतचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते थक्क झाले आहेत. गोविंदाचा हा व्हिडीओ जुना आहे मात्र सध्या तो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गोविंदाने जे केलं ते पाहून प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्याच्या दमदार परफॉरमन्सला दाद दिली.

बॉलिवूड अभिनेता गोविंदाने त्याच्या तब्येतीमुळे चाहत्यांना टेन्शन दिलं होतं. तो अचानक बेशुद्ध झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आता त्यांची प्रकृती चांगली असून त्याला डिस्चार्जही ही देण्यात आला आहे. गोविंदाच्या चाहत्यांनाही यामुळे दिलासा मिळाला. गोविंदाची फॅनफॉलोईंग प्रचंड आहे. चाहत्ये त्याचा डान्ससाठी वेडे आहेत. आजही त्याला ‘हिरो नंबर 1’ म्हणूनच संबोधलं जातं. दरम्यान गोविंदाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तो नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरत आहे.
प्रेक्षकांनी गोविंदासाठा जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या
गोविंदा एकदा टीव्ही शो सुपर डान्सर 5 च्या सीझनमध्ये गेस्ट म्हणून आला होता. यादरम्यान, गोविंदा स्पर्धक सोमांश डांगवाल या लहान मुलासोबत सोबत 27 वर्षे जुन्या “बडे मियाँ तो बडे मियाँ छोटे मियाँ….” या गाण्यावर नाचताना दिसला, त्यांची ऊर्जा पाहून प्रेक्षकांनी गोविंदासाठा जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या.
गोविंदाचा कोणता व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट “बडे मियाँ छोटे मियाँ” प्रदर्शित होऊन 27-28 वर्षे झाली. ज्यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांचा समावेश होता. डेव्हिड धवन दिग्दर्शित हा विनोदी-अॅक्शन चित्रपट 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता. अमिताभ-गोविंदा यांच्यातील विनोदी संवाद, त्यांची विनोदी शैली याला चांगला प्रतिसाद मिळाला.या चित्रपटातील एक गाणे “बडे मियाँ छोटे मियाँ” होते, ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. याच गाण्यावर गोविंदाने या लहान मुलासोबत डान्स केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
चाहत्यांच्या कमेंट्स
गोविंदाच्या व्हायरल व्हिडिओला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे . युजर्स विविध कमेंट्स देऊन त्याचे कौतुक करत आहेत. एका युजरने “जुने ते सोने” अशी कमेटंही केली आहे. तर दुसऱ्याने म्हटले, “तू नेहमीच आमचा आवडता आहेस.” असं म्हणत गोविंदा आजही प्रेक्षकांच्या मनात ‘हिरो नंबर 1’ च आहे हे दिसून येत.
गोविंदाची कारकीर्द
गोविंदा हा एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आहे. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात 1986 मध्ये “इल्जाम” या चित्रपटाने झाली, जिथे तो अॅक्शन आणि डान्स स्टार म्हणून उदयास आला. १९९० च्या दशकात, तो एक यशस्वी कॉमेडी आयकॉन बनला आणि “राजा बाबू”, “कुली नंबर 1,” “हिरो नंबर 1,” “बडे मियाँ छोटे मियाँ” सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला. आणि सगळ्याच चित्रपटाच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
