Govinda : धक्कादायक… गोविंदाच्या वैवाहिक आयुष्यात भूकंप.. पत्नी सुनीताच्या त्या कृतीने चर्चांना उधाण; वाचून तुम्हीही चक्रावाल
Ssunita Ahuja Surname : अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता हिने सोशल मीडियावरून आडनाव काढून टाकले आहे. यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय.

Ssunita Ahuja Surname : अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्याच काळापासून चर्चेत आहेत. गोविंदा आणि सुनीता यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत आणि दोघेही घटस्फोट घेण्याचा विचार करत आहेत अशा बातम्या काही काळापूर्वी आल्या होत्या. गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधांच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र सुनिता यांनी समोर येऊन सर्व बातम्या नाकारल्या आणि ते सर्व खोटं असल्याचंही स्पष्ट केलं. मी गोविंदासोबत खुश आहे आणि आमच्या दोघांचाही घटस्फोट होत नाही, असं सुनिता यांनी स्वत:च स्पष्ट शब्दांत सांगितलं.
मात्र त्याच सुनिता यांनी आचता इन्स्टाग्रामवर त्याचं नाव बदललं आहे. त्यामपुळे गोविंदा -सुनिता यांच्या आयुष्यातील मतभेदाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. एका वृत्तपत्राशी झालेल्या संभाषणात सुनीता यांनी पुन्हा एकदा या वृत्तांना अफवा असल्याचे म्हटले. ‘मी आहुजा आहे आणि हे कधीही बदलणार नाही. जेव्हा हे जग सोडून जाईन, तेव्हा आडनाव काढून टाकले जाईल’ असं सुनिता म्हणाल्या.

मग नाव का बदललं ?
पुढे, त्यांनी गोविंदासोबत घटस्फोट घेत असल्याच्या बातमीवरही प्रतिक्रिया दिली. सुनीता म्हणाली, ‘मी माझ्या नावातून आहुजा काढून टाकलं आणि माझ्या पहिल्या नावाच्या आधी अतिरिक्त S जोडला. मी हे अंकशास्त्रासाठी केले. मला नाव आणि प्रसिद्धी हवी आहे. ते कोणाला नको असते? बरोबर ना?’ असा सवालही तिने विचारला.’आम्ही एक आनंदी कुटुंब आहोत आणि आमच्याकडून थेट काहीही माहिती येईपर्यंत कोणताही विचार करू नका.’ असंच सुनिताने थे सांगितलं.
आता त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फक्त सुनीता यांचे नाव लिहिलं आहे. गोविंदा आणि सुनीताबद्दल सांगायचं झालं तर, दोघांचाही प्रेमविवाह झाला होता. त्यांचे लग्न 1987 साली झालं. गोविंदा आणि सुनीताला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुलं आहेत.
