मामा गोविंदानंतर भाचा कृष्णाचीही निवडणूक लढण्याची तयारी

मुंबई: हिरो नंबर वन अभिनेता आणि माजी खासदार गोविंदानंतर आता त्याचा भाचाही राजकारणात नशीब आजमावणार आहे. गोविंदाचा भाचा आणि कॉमेडी अभिनेता कृष्णा अभिषेक हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. कृष्णा अभिषेक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्याने मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची भेट घेऊन काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कृष्णा अभिषेकने उत्तर …

मामा गोविंदानंतर भाचा कृष्णाचीही निवडणूक लढण्याची तयारी

मुंबई: हिरो नंबर वन अभिनेता आणि माजी खासदार गोविंदानंतर आता त्याचा भाचाही राजकारणात नशीब आजमावणार आहे. गोविंदाचा भाचा आणि कॉमेडी अभिनेता कृष्णा अभिषेक हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. कृष्णा अभिषेक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्याने मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची भेट घेऊन काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कृष्णा अभिषेकने उत्तर मुंबई मतदारसंघातून तिकीटाची मागणी केली आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे गोपाळ शेट्टी खासदार आहेत. महत्त्वाचं म्हणजे कृष्णाने या मतदारसंघात ज्यांच्याकडे तिकीट मागितलं आहे, त्या संजय निरुपम यांनीच या मतदारसंघात निवडणूक लढवली होती. त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा संजय निरुपम स्वत: निवडणूक लढवणार की काँग्रेस अन्य कोणाला तिकीट देणार हे पाहावं लागणार आहे.

दरम्यान, उत्तर मुंबई मतदारसंघातून कृष्णा अभिषेकने तिकिटाची मागणी केली असली, तरी अभिनेत्री नगमा, अझर यांचीही नावं या मतदारसंघासाठी चर्चेत आहेत.

गोविंदा लोकसभेवर

यापूर्वी कृष्णाचा मामा अभिनेता गोविंदा अहुजाने लोकसभा निवडणूक लढवली होती. 2004 मध्ये गोविंदाने काँग्रेसमध्ये प्रवेश करुन, वसई विरार परिसरातून लोकसभा लढून, तो जिंकून आला होता. 2004 ते 2009 दरम्यान तो काँग्रेसचा लोकसभेचा खासदार होता. त्याने भाज नेते आणि माजी पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांचा पराभव केला होता. यानंतर गोविंदाने राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. अचानक घेतलेल्या निवृत्तीनंतर काँग्रेसमधील अनेक नेते गोविंदावर नाराज होते. गोविंदाला जिंकून आणण्यास आम्ही मदत केली, मात्र पक्षाला गरज असताना गोविंदाने माघार घेतली, अशी प्रतिक्रिया त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या

काँग्रेसला झटका, प्रिया दत्त यांची लोकसभेतून माघार

संजय काकडे काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवणार?  

लोकसभा निवडणूक : पुणे जिल्ह्याचं राजकारण निर्णायक ठरणार!   

मुंबई उत्तर मध्य लोकसभा : युती न झाल्यास पूनम महाजनांना मोठा फटका 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *