अभिनेत्रीने केला सासू-सासऱ्यांचा अपमान? बर्थडे व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले; म्हणाले “वाईट वाटलं हे पाहून…”
एक सेलिब्रिटी जोडीच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर नेटकरी संतापले आहेत. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने नवऱ्याच्या वाढदिवसादिवशी सासू-सासऱ्यांचा अपमान केल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आल्यानं नेटकऱ्यांनी अभिनेत्री आणि अभिनेत्याला ट्रोल केलं आहे.

बॉलिवूडप्रमाणेच टेलिव्हिजनचे सेलिब्रिटी देखील चर्चेत असतात. अशीच एक जोडी सध्या चर्चेत आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडी त्यांच्या एका व्हिडीओमुळे चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. ही जोडी आहे देबिना बॅनर्जी आणि तिचा नवरा तथा अभिनेता गुरमीत चौधरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामुळे सध्या त्यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे. हे व्हिडीओ गुरमीत चौधरीच्या वाढदिवसाचे आहेत.
गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीच्या व्हिडीओवर टीका
अभिनेता गुरमीत चौधरीने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. या अभिनेत्याने त्याचा वाढदिवस त्याच्या कुटुंबासह आणि जवळच्या मित्रांसह घरी साजरा केला. त्याची पत्नी आणि अभिनेत्री देबिना बॅनर्जीने त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर गुरमीतच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी देबिनावर राग व्यक्त केला आहे आहे तसेच नेटकऱ्यांनी गुरमीतवर टीकाही केली आहे.
वाढदिवसाच्या व्हिडीओमध्ये सासू-सासऱ्यांकडे केलं दुर्लक्ष
व्हिडीओमध्ये गुरमीत चौधरी त्याची पत्नी देबिना बॅनर्जी,पालकांसह घरी वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहे. यादरम्यान, गुरमीत आणि देबिना सोफ्यावर बसलेले दिसतात आणि देबिनाचे सासू-सासरे त्यांच्या मागे उभे असलेले दिसतात. केक कापताना, गुरमीतची आई गमतीने म्हणते, ‘त्याला जन्म देणाऱ्या आईचे अभिनंदन नाही का करायचं’ मात्र आईच्या या उत्तराला गुरमीत किंवा देबिना या दोघांपैकी कोणीही उत्तर दिलं नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष कराताना ते दिसले. हे पाहून नेटकरी भडकले.
View this post on Instagram
“केक कापण्यासाठीही पालकांना सहभागी करून घेता आलं नाही’
तसेच देबिना सोफ्यावर बसून आहे आणि तिचे सासू-सासरे मागे उभे राहिलेले दिसत असल्यानं चाहत्यांना तेही आवडले नाही. अशा परिस्थितीत नेटकऱ्यांनी या जोडप्याला खूप फटकारलं आहे. एका युजर्सने लिहिले आहे की, “वृद्ध आईवडील केक कापण्यासाठी उभे आहेत आणि देबिना सोफ्यावर बसून आहे. आई-वडिलांचा आदर करा कारण तुमच्या मुली तुम्हाला पाहत आहेत.” तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले आहे की ‘देबिना स्वतःला हिरोइन समजते, म्हणूनच ती नेहमी स्वत:ला परफेक्ट दाखवते.” अशा अनेक कमेंट्स करून देबिनाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
चाहते गुरमीत चौधरीवरही रागावले
तसेत नेटकऱ्यांनी गुरमीतलाही ट्रोल केलं आहे, एका युजर्सने लिहिलं आहे ‘मला काकूंसाठी खूप वाईट वाटत आहे’, तर एकानं लिहिलं आहे ‘ही फक्त देबिनाची चूक नाही, तर गुरमीतही यासाठी तितकाच जबाबदार आहे.’ असं म्हणत या दोघांनाही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
