Dilip Joshi Net Worth | लक्झरी गाड्यांचा शौक, ‘तारक मेहता…’चे ‘ जेठालाल’ एका दिवसांत कमावतात लाखो रुपये!

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) ही मालिका बर्‍याच वर्षांपासून प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. या शोच्या प्रत्येक पात्राने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही पात्र त्यांच्या नावापेक्षा कमी आणि या मालिकेतील नावाने जास्त ओळखली जातात.

Dilip Joshi Net Worth | लक्झरी गाड्यांचा शौक, 'तारक मेहता...'चे ‘ जेठालाल’ एका दिवसांत कमावतात लाखो रुपये!
जेठालाल

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) ही मालिका बर्‍याच वर्षांपासून प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. या शोच्या प्रत्येक पात्राने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही पात्र त्यांच्या नावापेक्षा कमी आणि या मालिकेतील नावाने जास्त ओळखली जातात. या शोमध्ये ‘जेठालाल’ची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी अगदी लहान वयातच काम करण्यास सुरुवात केली होती. परंतु, या शोमधूनच त्यांना खरी ओळख मिळाली आहे. प्रत्येक घरात त्यांना ‘जेठालाल’ म्हणूनच ओळखले जाते. आज (26 मे) दिलीप जोशी आपला 53 वाढदिवशी साजरा करत आहेत (Happy birthday Dilip Joshi know about Dilip Joshi Net Worth).

दिलीप जोशी यांनी बर्‍याच टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘हम आपके है कौन’, ‘खिलाडी 420’, ‘हमराज’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ अशा अनेक चित्रपटांत काम केले होते. एवढेच नाही तर ते अनेक सुपरहिट मालिकांमध्येही दिसले आहेत. स्वत: दिलीप जोशी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम केल्यानंतर लोकांबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला आहे.

मालिकेच्या एका भागासाठी आकारतात इतके शुल्क

‘जेठालाल’ फेम अभिनेते दिलीप जोशी हे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत. रिपोर्ट्सनुसार दिलीप जोशी निर्मात्यांकडून एका एपिसोडसाठी तब्बल दीड लाख रुपये मानधन घेतात. या शोचे ते असे एकमेव कलाकार आहेत, ज्यांचे मानधन खूप जास्त आहे. एका महिन्यात ते जवळपास 36 लाख रुपयांपर्यंत कमाई करतात (Happy birthday Dilip Joshi know about Dilip Joshi Net Worth).

‘लक्झरी’ वाहनांचा शौक

अभिनेते दिलीप जोशी एका महिन्यात केवळ 25 दिवस काम करतात. उर्वरित वेळ कुटुंबासमवेत घालवणे त्यांना आवडते. दिलीप जोशी यांना लक्झरी गाड्या फार आवडतात. त्याच्याकडे ‘ऑडी क्यू 7’ आणि ‘इनोव्हा’ कार आहे.

लाईफस्टाईल

दिलीप जोशी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मनोरंजन विश्वात इतके दिवस काम करूनही एक वेळ अशी आली की, त्यांच्याकडे 1 वर्ष काम नव्हते. यानंतरच त्यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोची ऑफर देण्यात आली. या शोने त्यांचे भाग्य बदलले. या शोपासून दिलीपने रॉयल लाइफस्टाईल जगण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कामच्या या व्यस्त वेळापत्रकात काही दिवसांची सुट्टी घेणे आणि आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवणे, ते कधीच विसरत नाहीत.

(Happy birthday Dilip Joshi know about Dilip Joshi Net Worth)

हेही वाचा :

Photo : ‘सुंदरा मनामध्ये भरली’, अभिनेत्री अक्षया नाईकचा ग्लॅमरस अवतार पाहिलात?

Photo : अनुपमा फेम मदालसाला मिळालं खास सरप्राईज, सेटवर कुटुंबियांची हजेरी

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI