Dharmendra Death : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्यांदा बोलल्या हेमा मालिनी… कसे होते रुग्णालयातील शेवटचे क्षण?
Dharmendra Death : अशी परिस्थिती कोणावरच नको... धर्मेंद्र यांचे शेवटचे क्षण आठवत हेमा मालिनी झाल्या भावूक... रुग्णालयातील आणि शेवटचे क्षण आठवत केला मोठा खुलासा..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हेमा मालिनी यांची चर्चा...

Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरली. तर देओल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. 24 नोव्हेंबर 2025 मध्ये धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 89 व्या वर्षी धर्मेंद्र यांचं निधन झालं. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी पहिल्यांदा मौन सोडलं आहे. त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडीओ, धर्मेंद्र यांची शेवटच्या दिवसातील प्रकृती याबद्दल हेमा मालिनी यांनी सांगितलं आहे. नेहमी प्रमाणे यावेळी देखील धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर होईल आणि ते घरी येतील असं कुटुंबियांना वाटलं, पण तसं झालं नाही. अखेर धर्मेंद्र यांनी शेवटचा श्वास घेतलं.
हेमा मालिनी ते कठीण क्षण आठवत म्हणाल्या, ‘हा फार मोठा धक्का आहे, ज्याला सहन करणं देखील फार कठीण आहे… तो काळ भयानक होता. 1 महिना त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यामुळे आम्ही खूप संघर्ष केला. रुग्णालयात जे काही सुरु होतं, त्यासोबत लढण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो.. तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो. ईशा, अहाना, सनी बॉबी… याआधी देखील त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल केलं होतं. उपचारानंतर ते घरी देखील आले. यावेळी देखील असंच होइल असं आम्हाला वाटलं. पण तसं काहीही झालं नाही.’
‘ते (धर्मेंद्र) आमच्यासोबत बोलत देखील होते… त्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. 8 डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसाची तयारी देखील करण्यात आली होती. खरं त्यांना अशा अवस्थेत पाहणं फार कठीण होतं… अशी परिस्थिती कोणावरच नको…’ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल देखील हेमा मालिनी यांनी मोठं वक्तव्य केलं. ‘अशा गोष्टी पाहिल्यानंतर माझ्या जवळच्या अनेकांनी मला मेसेज केले. मला धीट राहण्यास सांगत होते… पण मी खूर स्ट्रॉन्ग आहे. मी कायम माझ्या भावना माझ्याकडे ठेवते… जेव्हा 20 वर्षांपूर्वी माझ्या आईचं निधन झालं तेव्हा मला असं वाटतं मी कसं जगेल. पण आयुष्य आपल्याला सर्वकाही शिकवतं…’
पुढे हेमा मालिनी म्हणाल्या, ‘माझ्या मुली आजही त्यांच्या वडिलांसाठी रडत असतात. पण मी त्यांना समजावते. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येतं… सकाळी घरी थेपले बनवले होते. त्यांना चटणीसोबत थेपले प्रचंड आवडायचे… आमच्या घरातील इडली, सांबार आणि कॉफी त्यांना खूप आवडायची… जेव्हा घरी त्यांच्या आवडीचे पदार्थ मिळतात, आम्हाला त्यांची आठवण येते..’ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या.
