AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेमा मालिनी यांच्याकडे आलिशान गाड्या, एक अब्ज रुपयांहून अधिक संपत्ती, धर्मेंद्र यांच्याकडची कॅश म्हणजे…

Hema Malini Networth : हेमा मालिनी यांच्याकडे एक दोन नाही तर, इतक्या आलिशान गाड्या, अब्ज रुपयांच्या घरात संपत्ती, धर्मेंद्र यांच्याकडे देखील गडगंज संपत्ती, त्यांच्याकडे असणारी कॅश म्हणजे... आकडा जाणून व्हाल हैराण, निवजणुकीपूर्वी हेमा मालिनी यांची संपत्ती समोर...

हेमा मालिनी यांच्याकडे आलिशान गाड्या, एक अब्ज रुपयांहून अधिक संपत्ती, धर्मेंद्र यांच्याकडची कॅश म्हणजे...
| Updated on: Apr 07, 2024 | 9:44 AM
Share

अभिनेत्री हेमा मालिका कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. पण आता हेमा मालिनी त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत आल्या आहेत. एकट्या हेमा मालिनी अब्जवधी रुपयांच्या मालकीण आहे. तर पती धर्मेंद्र यांची संपत्ती मिळून तयार होणार आकडा थक्क करणारा आहे. सांगायचं झालं तर, उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हेमा मालिनी यांच्याकडे सात चारचाकी गाड्या आहेत आणि त्यांना दागिन्यांचीही शौक आहे. त्यांनी नुकत्याच केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला आहे.

गुरुवारी मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या हेमा यांनी भारतीय निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांच्याविरुद्ध कोणताही फौजदारी किंवा दिवाणी गुन्हा दाखल नाही. यावेळी हेमा मालिनी यांच्या संपत्तीचा आकडा देखील समोर आला आहे. त्यांच्याकडे तब्बल 129 कोटी रुपयांची संपत्ती आहे. गेल्यावर्षी त्यांच्याकडे 125 कोटी रुपयांची संपत्ती होती. सांगायचं झालं तर, 2019 नंतर हेमा मालिनी यांच्या संपत्तीमध्ये 4 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

प्रतिज्ञापत्रातून समोर आलेल्या माहितीनुसार, 3 कोटी 39 लाख, 39 हजार 307 रुपयांचे दागिने आहेत. तर, त्यांचे पती धर्मेंद्र यांच्याकडे देखील 1 कोटी 75 लाख 8 हजार 200 रुपयांचे आभूषण आहेत. हेमा मालिनी यांच्या बँकेत 12 कोटी 98 लाख 2 हजार 951 रुपये आहेत. धर्मेंद्र यांच्या बँकेत 17 कोटी 15 लाख 61 हजार 453 रुपये आहेत.

पती धर्मेंद्र यांच्याकडे असलेली रोकड

प्रतिज्ञापत्रानुसार, हेमा मालिनी यांच्याकडे 18 लाख 52 हजर 865 रुपयांची कॅश आहे. तर धर्मेंद्र यांच्याकडे 43 लाख 19 हजार 16 रुपये रोकड आहे. जमिनीबाबत सांगायचं झालं तर, हेमा यांच्याकडे एकूण 20 लाख 91 हजार 3 हजार 360 रुपयांची अचल संपत्ति आहे. तर त्यांचे पती धर्मेंद्र यांच्याकडे 93 लाख 67 हजार 813 रुपयांची अचल संपत्ति आहे.

हेमा यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्याकडे 1 अब्ज 13 कोटी 60 लाख 51 हजार 610 रुपयांच्या विविध मालमत्ता आहेत. तर त्यांचे पती धर्मेंद्र यांच्याकडे 1 अब्ज 36 कोटी 7 लाख 66 हजार 813 रुपयांचे बंगले आणि इतर मालमत्ता आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हेमा मालिनी यांच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे.

हेमा मालिनी यांचं बॉलिवूड करियर

हेमा मालिनी आज बॉलिवूडपासून दूर असल्या तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता हेमा मालिनी निवडणुकीमुळे चर्चेत आहेत. सांगायचं झालंतर, काही दिवसांपूर्वी हेमा मालिनी यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याचा इच्छा व्यक्त केली होती. हेमा मालिनी यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही हेमा मालिनि यांचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहतात.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा