AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hema Malini | सोशल मीडियावर धर्मेंद्र यांनी माफी मागितल्यानंतर हेमा मालिनी म्हणाल्या, ‘त्यांना चिंता होती, पण…’

धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या कुटुंबाला आजही करावी लागते तडजोड, हेमा मालिनी यांचं वक्तव्य समोर, धर्मेंद्र सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींवर असलेलं प्रेम व्यक्त करतात पण...

Hema Malini | सोशल मीडियावर धर्मेंद्र यांनी माफी मागितल्यानंतर हेमा मालिनी म्हणाल्या, 'त्यांना चिंता होती, पण...'
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 10:23 AM

मुंबई | अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. धर्मेंद्र – हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष झाली आहेत. पण आजही हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींना धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाने स्वीकारलेलं नाही. हेमा मालिनी आजही तडजोड करत आयुष्य जगत असतात. देओल कुटुंबाच्या कोणत्याही कार्यक्रमात हेमा मालिनी यांना निमंत्रण नसतं. नुकताच अभिनेते सनी देओल यांचा मुलगा करण देओल याच्या लग्नात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली लग्नाच्या कोणत्याच कार्यक्रमात दिसल्या नाहीत. पण अभिनेत्री ईशा देओल हिने मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून करण याला वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

अखेल लग्न सोहळा पार पडल्यानंतर धर्मेंद्र यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून हेमा मालिनी आणि दोन मुली ईशा – अहाना यांची माफी मागितली. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी मोठं वक्तव्य केलं. मुलींना चांगले जोडीदार मिळतील की नाही, या चिंतेत कायम धर्मेंद्र असायचे.. असं हेमा मालिनी म्हणाल्या.

पुढे हेमा मालिनी म्हणाल्या, ‘माझ्या दोन्ही मुलींवर चांगले संस्कार झाले आहेत. धर्मेंद्र कायम आमच्या सोबत होते. ते कायम म्हणायचे मुलींचं लग्न योग्य वयात झालं पाहिजे. तेव्हा मी त्यांना दिलासा द्यायची आणि म्हणायची होईल… योग्य वेळी योग्य मुलगा येईल आणि त्यांचं लग्न होईल. देव आणि गुरुंच्या आशीर्वादामुळे सर्व काही शक्य झालं..’ असं हेमा मालिनी म्हणाल्या.

धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश कौर आहे. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. महत्त्वाचं म्हणजे, प्रकाश कौर धर्मेंद्र यांना घटस्फोट देण्यासाठी तयार नव्हत्या. यामुळे धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं.

धर्मेंद्र यांच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेते लवकरच ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात धर्मेंद्र यांच्या शिवाय, जया बच्चन, शबाना अझमी, रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

सोशल मीडियावर देखील धर्मेंद्र कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते आजही धर्मेंद्र यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश.
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या.
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार.
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?.
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश.
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल.
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती.
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.