खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मुंबईतील 12.50 दोन अपार्टमेंट विकले, किती आहे त्यांची संपत्ती ?
बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी ऐन गणेशोत्सवात एक नवीन कार खरेदी केली आहे. तसेच त्यांनी त्याच्या मुंबईतील दोन अपार्टमेंटही विकल्या आहेत.

बॉलिवूडच्या एकेकाळच्या ड्रीम गर्ल आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी राजकारणामुळे नव्हे तर त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टी डीलमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी अलिकडेच अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा परिसरातील उच्चभ्रू अशा ओबेरॉय स्प्रिंग सोसायटीतील दोन अपार्टमेंट विकले आहेत. तसेच गणेशोत्सवात त्यांनी नवीन कार देखील खरेदी केली आहे. तिची किंमतीही कोट्यवधी रुपये आहे. अखेर या बॉलिवूडच्या एकेकाळच्या दिग्गज अभिनेत्री असलेल्या हेमा मालिनी यांची संपत्ती नेमकी किती आहे ?
हेमा मालिनी यांनी विकले दोन अपार्टमेंट
स्क्वायरयार्ड्स.कॉमद्वारा मिळालेल्या पंजीकरण दस्ताएवजानुसार ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांनी मुंबईच्या ओशिवरा येथील दोन अपार्टमेंट 12.50 कोटी रुपयांना विकल्या आहेत. हे अपार्टमेंट आलिशान ओबेरॉय स्प्रिंग सोसायटीतील असून त्यांचा आकार एक सारखा आहे. त्यांचा कार्पेट एरिया प्रत्येकी 847 चौरस फूट आणि निर्मिती क्षेत्रफळ 1,017 चौरस फूट आहे. दोन्ही अपार्टमेंट प्रत्येकी 6.25 रुपयांना विकले आहेत. यात कार पार्किंगची जागा देखील सामील आहे.
यातील दोन्ही सौद्यांवर आतापर्यंत 31.25 लाख रुपयांची स्टँप ड्युटी आणि 30,000 रुपये रजिस्ट्रेशन चार्ज देखील भरलेला आहे. ओबेराय स्प्रिंगही मुंबईतील सर्वात प्रीमियम रेसिडेंशियल हब मानला जातो. येथे अनेक चित्रपट तारे आणि बिझनसमन रहातात. शानदार लोकेशन, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि मेट्रोची कनेक्टिविची त्यामुळे गुंतवणूक आणि लक्झरी लाईफ स्टाईल दोन्ही दृष्टीने हा परिसर खूपच खास आहे.
कोट्यवधीच्या मालकीन आहेत हेमा मालिनी
हेमा मालिनी यांची नेटवर्थ (Hema Malini Net Worth) किती आहे या संदर्भात गेल्या मथुरा लोकसभा निवडणूकीच्या अर्जात दिलेल्या माहितीनुसार त्यांनी त्यांची संपत्ती 122.19 कोटी रुपये दर्शविली होती. त्यांची एकूण संपत्ती 123.61 कोटी रुपये आहे.त्यात 1.42 कोटी रुपयांची देणी आहेत.
