AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मनाचे श्लोक’ सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बंद पाडणे भोवले, उज्वला गौड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा मनाचे श्लोक हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बंद पाडला. पण असे करणे त्यांना महागात पडले आहे.

'मनाचे श्लोक' सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बंद पाडणे भोवले, उज्वला गौड यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Manache ShlokImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 12, 2025 | 1:01 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेचा ‘मनाचे श्लोक’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटाला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विरोध केला. काल पुण्यातील अभिरुची थिएटकमध्ये या चित्रपटाचा शो सुरु होता. हिंदू संघटनेशी संबंधीत असलेल्या उज्वला गौड यांनी काही कार्यकर्त्यांसोबत मिळून या चित्रपटाचा शो बंद पाडला. पण असे करणे त्यांना चांगलेच भोवले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुण्यातील अंलकार पोलिस ठाण्यात उज्वला गौड यांच्याविरोधात मनाचे श्लोक सिनेमा बंद पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे आणि थिएटरमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसात गोंधळ घातल्याचा आरोप उज्वला गौड यांच्यावर करण्यात आला आहे.

वाचा: BCCI अध्यक्ष मिथुन मन्हास करतायेत भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीला डेट? एका Photoमुळे चर्चांना उधाण

पोलिसात तक्रार

मनाचे श्लोक हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. काल, पुण्यातील अभिरुची थिएटरमध्ये या चित्रपटाचा शो सुरु होता. त्यावेळी उज्वला गौड या काही कार्यकर्त्यांसोबत चित्रपटाचा शो बंद पाडण्यासाठी गेल्या होत्या. थिएटरमध्ये गोंधळ घालतानाचे त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनेकांनी त्यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या. आता उज्वला गौड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी बंद पाडला होता शो

या चित्रपटाला पुण्यातून विरोध होत आहे. समर्थ रामदास स्वामी महाराजांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर चित्रपटासाठी केल्यामुळे नव्या मराठी चित्रपटावर वादंग निर्माण झाला आहे. हिंदू जनजागृती समितीने या चित्रपटाला तीव्र विरोध दर्शवला असून, हा हिंदूंच्या श्रद्धेचा “बाजार मांडण्यासारखा प्रकार” असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी पुण्यातील कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपट कार्यकर्त्यांनी चालू शो मध्ये गोंधळ घालत शो बंद पडला होता.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.