AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hindustani Bhau | ‘बिग बॉस’ फेम हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांनी केली अटक, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक आणि सोशल मीडियावर ‘हिंदुस्थानी भाऊ’ (Hindustani Bhau) म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकास पाठक (Vikas Pathak) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Hindustani Bhau | ‘बिग बॉस’ फेम हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांनी केली अटक, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
विकास पाठक
| Updated on: May 08, 2021 | 5:12 PM
Share

मुंबई : ‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक आणि सोशल मीडियावर ‘हिंदुस्थानी भाऊ’ (Hindustani Bhau) म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकास पाठक (Vikas Pathak) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पापाराजी विराल भयानी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर ही बातमी शेअर केली आहे. सोशल मीडियावरील या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, हिंदुस्थानी भाऊ मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलन करत होते. ज्यानंतर आज (8 मे) पोलिसांनी काही काळापूर्वी त्यांना अटक केली आहे. इयत्ता 12वीच्या मुलांची परीक्षा रद्द करण्यासाठी हिंदुस्थानी भाऊ येथे आंदोलन करत होते. यासह त्यांनी सरकारने मुलांची शालेय फी माफ करावी, अशी मागणी देखील केली आहे (Hindustani Bhau arrested by Mumbai police for violating section 144 rules).

आपण सर्वांनीच कधीना कधीतरी सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊंची एक झलक पाहिली असेल. नुकतेच इंस्टाग्रामने प्रक्षोभक पोस्टमुळे त्यांचे खाते निलंबित केले होते. असे म्हटले जाते की, त्यांचे खाते निलंबित करण्यामागे लेखक पुनीत शर्मा यांचा हात होता. 2020मध्ये विकास पाठक यांचे खाते निलंबित केले गेले. ज्यानंतर त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणे थांबले आहेत. काही काळानंतर त्यांचे फेसबुक अकाऊंटही निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर बिग बॉसचा हा माजी स्पर्धक आता मुंबईत उघडपणे रस्त्यावर आंदोलन करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हिंदुस्थानी भाऊ पहिल्यापासूनच आपल्या व्हिडींओंमुळे चर्चेत आहेत. ते सोशल मीडियावर देश आणि जगाच्या वेगवेगळ्या घटनांबद्दल व्हिडीओ शेअर करत असतात. काही लोकांना त्यांचे व्हिडीओ खूप आवडतात, तर पुष्कळ लोक असेही आहेत जे त्यांच्या पोस्ट रिपोर्ट करतात. हिंदुस्थानी भाऊच्या एका व्हिडीओवर पुनीत शर्मा यांनी अज्ञातपणे तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर इंस्टाग्रामवर विकासचे खाते निलंबित केले गेले. विकास सुरुवातीपासूनच बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा सर्वात मोठा चाहता असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, त्याने स्वत:बद्दल यापूर्वी कधीही उल्लेख केलेला नाही (Hindustani Bhau arrested by Mumbai police for violating section 144 rules).

कसं पडलं ‘हिंदुस्थानी भाऊ’ नाव?

विकास पाठक हा ‘हिंदुस्तानी भाऊ’ या नावाने टिकटॉक, यूट्युब आणि फेसबुकवर प्रसिद्ध होते. देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांची हिंदुस्तानी भाऊ आपल्या शैलीत फिरकी घेतात. भाऊचे टिकटॉकवर 6 लाख, तर यूट्युबवर तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. मराठमोळा बबलू उर्फ विकास जयराम पाठक हे जन्माने मुंबईकर आहेत. आई-वडील, पत्नी आणि मुलगा आदित्य यांच्यासह ते मुंबईत राहतात.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताविषयी बोलणाऱ्यांना चपराक लगावण्यासाठी त्यांनी सहजच एक व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओला चांगले हिट्स मिळाले आणि इथूनच विकासचं ‘हिंदुस्थानी भाऊ’ असं नामकरण झालं. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

(Hindustani Bhau arrested by Mumbai police for violating section 144 rules)

हेही वाचा :

Khatron Ke Khiladi 11 | केपटाऊनमध्ये पोहचले टीव्ही जगतातले ‘खिलाडी’, शूटिंग पूर्वी धमाल-मस्ती, पाहा फोटो

Video | चार वर्षांच्या लेकाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी, पती अभिनवचा दावा!

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.