हिंदुस्तानी भाऊ ‘या’ वेब सीरिजमधून करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण!

बिग बॉसचा 13 मधील सदस्य हिंदुस्थानी भाऊचे (Hindustani Bhau) नाव नेहमीच चर्चेत असते.

हिंदुस्तानी भाऊ 'या' वेब सीरिजमधून करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण!

मुंबई : बिग बॉसचा 13 मधील सदस्य हिंदुस्थानी भाऊचे (Hindustani Bhau) नाव नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच हिंदुस्थानी भाऊने एकता कपूर (Ekta Kapoor) विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. एकता कपूरची वेब सीरिज XXX Unsensored च्या काही दृश्यांवरून हिंदुस्थानी भाऊने गोंधळ देखील घातला होता. त्यानंतर एकता कपूरने यासर्व प्रकरणावर माफी मागितली होती. बिग बॉस फेम हिंदुस्तानी भाऊचे खरे नाव विकास पाठक आहे. आता स्वत: हिंदुस्थानी भाऊ एका वेब सीरिजमध्ये काम करणार आहे. ‘दौलतगंज’ असे या वेब सीरिजचे नाव आहे. (Hindustani Bhau will make an entry in this web series)

या वेब सीरिजची शूटिंग अयोध्येत सुरू देखील झाली आहे. वेब सीरिजमध्ये हिंदुस्थानी भाऊ व्यतिरिक्त अभिनेता दक्ष अजित सिंह आणि एहसान खानसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शक फिरोज खानची ही वेब सीरिज यावर्षीच प्रदर्शित होणार आहे. ‘हिंदुस्तानी भाऊ’बाबत अनभिज्ञ असलेले मोजकेच नेटिझन्स असतील. विकास पाठक हा ‘हिंदुस्तानी भाऊ’ या नावाने टिकटॉक, यूट्युब आणि फेसबुकवर प्रसिद्ध आहे. देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांची हिंदुस्तानी भाऊ आपल्या शैलीत फिरकी घेतो. भाऊचे टिकटॉकवर 6 लाख, तर यूट्युबवर तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

मराठमोळा बबलू उर्फ विकास जयराम पाठक हा जन्माने मुंबईकर आहे. तो आई-वडील, पत्नी आणि मुलगा आदित्य यांच्यासह मुंबईत राहतो. पुलवामा हल्ल्यानंतर भारताविषयी बोलणाऱ्यांना चपराक लगावण्यासाठी त्याने सहजच एक व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओला चांगले हिट्स मिळाले. विकासचं ‘हिंदुस्थानी भाऊ’ असं नामकरण झालं. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

संबंधित बातम्या : 

Pataudi Palace | पतौडी पॅलेसमध्ये तांडवचं शूटिंग, परंतु या कारणामुळे सैफ अस्वस्थ!

OTT Debut | संजय लीला भन्साळी ‘इतिहासातून भविष्याकडे’, उचलणार मोठं पाऊल, रिचा चड्ढाला लॉटरी?

(Hindustani Bhau will make an entry in this web series)

Published On - 12:56 pm, Tue, 12 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI