Holi 2021 | मालिकांमध्ये होळीच्या सणाची धमाल, पाहायला मिळणार नात्यांचे बदलते रंग!

आज होळी (Holi 2021) आणि धुळवडीच्या निमित्ताने सगळेच जण रंगात रंगलेले आहेत. अशावेळी मालिकांमध्येही होळी आणि धुळवडीच्या सणाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

Holi 2021 | मालिकांमध्ये होळीच्या सणाची धमाल, पाहायला मिळणार नात्यांचे बदलते रंग!
मालिकांमध्ये होळीच्या सणाची धमाल

मुंबई : आज होळी (Holi 2021) आणि धुळवडीच्या निमित्ताने सगळेच जण रंगात रंगलेले आहेत. अशावेळी मालिकांमध्येही होळी आणि धुळवडीच्या सणाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत होळीच्या सणाची धामधूम पाहायला मिळणार आहे. या जल्लोषात ढवळे मामी भांगेच्या नशेत अक्काच्या कारस्थानांचा पश्याकडे खुलासा करणार आहे. त्यामुळे होळीच्या जल्लोषासोबतच मालिकेत अक्काचा डाव उलटला जाणार आहे. अक्काच्या कारस्थानांपासून पश्या कुटुंबाचं रक्षण कसा करणार याची उत्सुकता असणार आहे (Holi 2021 celebration and twist turns in star pravah famous Marathi serial).

आई देणार संजनाला उत्तर!

‘आई कुठे काय करते’मध्ये यावर्षीही होळीचा सण उत्साहात साजरा होणार आहे. यंदाच्या उत्सवावर कोरोनाचं सावट असल्यामुळे पूजाविधी कुटुंबाच्या उपस्थितीतच पार पडणार आहेत. सध्या अनिरुद्ध-संजना प्रकरणामुळे घरात चिंतेचं वातावरण असलं, तरी होळीचा सण मात्र एकत्रित येऊन साजरा करण्याचं सर्वांनी ठरवलं आहे. देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना संजनाची एंट्री झाली नाही तरच नवलच! होळीच्या या पारंपरिक पूजेत संजनाला देखिल सहभागी करावं, अशी अनिरुद्धची इच्छा असते. अनिरुद्धच्या अश्या वागण्याने अरुंधती दुखावली जाते. यामुळे पुढे काय होणार? हे महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

(Holi 2021 celebration and twist turns in star pravah famous Marathi serial)

कार्तिक-दीपाच्या नात्यावरचं संकट होणार दूर

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या नात्यावर गैरसमजांचं मळभ आलं आहे. होळीच्या निमित्ताने या दोघांमधले गैरसमज दूर होतील, असं वाटत असतानाच दोघांमधील दुरावा आणखी वाढला आहे. दीपा कार्तिकच्या नात्याचं भविष्य काय असेल, हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये उलगडेलच पण या संपूर्ण टीमने जल्लोषात होळी साजरी केली आहे.

शुभम-कीर्तीच्या नात्यात दुरावा

फुलाला सुगंध मातीचा मालिकेतही शुभम-कीर्तीच्या नात्यात दुरावा आला आहे. ऐन सणाच्या दिवशीही शुभम कीर्तीकडून रंग लावून घेत नाही. शुभमचं हे वागणं कीर्तीला खटकतं. शुभमच्या अशा वागण्याचं कारण कीर्तीला कळेल का? दोघांमधील हा दुरावा आणखी किती काळ रहाणार, हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल. होळीच्या निमित्ताने शुभम-कीर्तीवर एक रोमँटीक गाणं देखिल चित्रित करण्यात आलं आहे.

(Holi 2021 celebration and twist turns in star pravah famous Marathi serial)

हेही वाचा :

Holi 2021 | ‘देसी गर्ल’ने परदेशात साजरी केली धमाल होळी, पती निकसह सासू-सासऱ्यांना लावला रंग!

चहा शौकीन सारा पोहोचली ‘सैफ चायवाला’ स्टॉलवर, छोट्या नवाबसाठी शेअर केला खास मेसेज!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI