एक दोन नाही, तर एवढ्या अभिनेत्रींसोबत गोविंदाची लफडी, बरंच सहन केलं, अखेर वैतागून सुनीताने…
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनिता यांच्या घटस्फोटाबद्दल चर्चांना उधाण आलं आहे. एका अभिनेत्रीसोबत असलेल्या अफेअरमुळे या जोडीचा घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं जातं. पण गोविंदाने अद्याप तरी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

बॉलिवूडचा हिरो नंबर वन म्हणजेच गोविंदा हा आधी त्याच्या चित्रपटासाठी, त्यांच्या डान्ससाठी आणि अभिनयासाठी कायम चर्चेत राहायचा. आताही त्याचे चाहते कमी नाहीयेत. गोविंदा आताही सर्वांचा लाडका अभिनेता आहे. पण आता तो जास्त चर्चेत राहतोय ते वैयक्तिक कारणांमुळे. मुख्य कारण म्हणजे घरगुती वाद. त्याच्यात आणि पत्नी सुनिता आहुजा यांच्यात सुरु असलेला वाद, आणि घटस्फोटापर्यंत गेलेलं प्रकरण. या सर्व गोष्टी आता चर्चेचा विषय ठरत आहेत.
बॉलिवूडच्या अनेक टॉपच्या अभिनेत्रींची नावे गोविंदासोबत जोडली गेली
एका अभिनेत्रीसोबत त्याचे अफेअर सुरु असल्याच्या चर्चा येत असून त्यामुळे त्यांच्यातील वाद आता घटस्फोटापर्यंत गेल्याचं म्हटलं जात आहे. सुनिताने अलिकडेच हे एका व्लॉगमध्ये देखील हे सांगितलं आहे. पण हे पहिल्यांदाच घडत नाहीये. कारण याआधीही या अभिनेत्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. बॉलिवूडच्या अनेक टॉपच्या अभिनेत्रींची नावे गोविंदासोबत जोडली गेली आहेत. एवढंच नाही तर असंही म्हटलं जातं की गोविंदाचे अफेअर हे त्याच्या लग्नानंतरही सुरुच होते. आणि या गोष्टी बऱ्याचदा सुनितापर्यंत गेल्या आहेत. पण गोविंदाच्या या गोष्टींमुळे ती वैतागली असल्याचं म्हटलं जातं.
गोविंदाचे नाव कोणत्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते ते जाणून घेऊयात.
नीलम कोठारी – गोविंदाच्या अफेअर लिस्टमध्ये पहिले नाव आहे 90 च्या दशकातील अभिनेत्री नीलम कोठारीचे. नीलमसोबत गोविंदाचे अफेअर होते गे जवळपास सर्वांनाच माहित आहे. एकेकाळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. नीलमशी लग्न करण्यासाठी गोविंदाने सुनितासोबत झालेला त्याचा साखरपुडाही मोडला होता.पण त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. आणि दोघांचेही ब्रेकअप झाले.
माधुरी दीक्षित – गोविंदाचे नाव बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितशीही जोडले गेले होते. वृत्तानुसार, दोघांचेही बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. परंतु याचा कोणताही पुरावा कधीच सापडला नाही.
रवीना टंडन – रवीना टंडनचेही नाव या यादीत आहे. जिने गोविंदासोबत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघांमध्ये वर्षांपूर्वी अफेअर होते. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.
दिव्या भारती – गोविंदाबद्दल असेही म्हटले जाते की त्याला अभिनेत्री दिव्या भारती देखील खूप आवडायची. एकेकाळी त्यांच्याही अफेअरच्या बातम्या मासिकांमध्येही खूप प्रसिद्ध झाल्या होत्या.
राणी मुखर्जी – या अभिनेत्रींमध्ये राणी मुखर्जीचे नाव देखील तवढेच प्रसिद्ध आहे. कारण राणी मुखर्जी आणि गोविंदाची जोडी तशी हिट झाली होती. त्यांनीही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यावेळीच राणी मुखर्जी आणि गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा होत होत्या. पण नंतर दोघांनीही यावर काहीही भाष्य केलं नाही.
View this post on Instagram
गोविंदाने 1987 मध्ये सुनीता आहुजासोबत लग्न केलं. लग्नानंतर या जोडीला टीना आणि यशवर्धन आहुजा ही मुले झाली. पण आता असे वृत्त आहे की गोविंदा आणि सुनीता 37 वर्षांच्या लग्नानंतर त्यांचे नाते संपवणार आहेत. याचे कारण गोविंदाचे विवाहबाह्य संबंध असल्याचं म्हटलं जातं. एवढंच नाही तर लग्नानंतर देखील गोविंदाचे अफेअर सुरु होते असं म्हटलं जातं त्यामुळे आता सुनिताने अखेर त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला जात आहे.
