ठेच्याची चव लय भारी, जान्हवी कपूरच्या तोंडात पाणी, रेसिपी जाणून घ्या

महाराष्ट्रीयन ठेच्याची चव ही ‘लय भारीच’ आहे. अहो ठेचा पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. ठेच्यासमोर एकापेक्षा एक चविष्ट पदार्थ देखील काहीच नाही. ठेचा पाहिल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूरच्या तोंडाला देखील पाणी सुटलं आहे. तसं तर ठेचा बनवणं काही अवघड काम नाही. जाणून घेऊया रेसिपी.

ठेच्याची चव लय भारी, जान्हवी कपूरच्या तोंडात पाणी, रेसिपी जाणून घ्या
Follow us
| Updated on: Dec 14, 2024 | 3:43 PM

तुम्हाला ठेचा आवडतो का? असा प्रश्न विचारल्यावर तुम्ही म्हणाल, ‘सगळं सोडा आणि ठेचा भाकरी द्या,’ त्याची चवच न्यारी. अहो मोठमोठ्या स्टार्सनाही ठेचाचे वेड आहे. ठेचा पाहिल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूरच्या तोंडाला पाणी सुटलं आहे. जान्हवीने एका मुलाखतीत आपल्या ठेच्याचं कौतुक केलं आहे.

जान्हवी कपूरची आवडती कविता

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ठेचा बनवण्यासाठी खूप कमी घटकांची आवश्यकता असते. ही एक साईड डिश असूनही चवीमुळे कधीच बाजूला राहू शकत नाही. लोकांना त्याची तिखट चव आवडते. भाकरी, भात किंवा इतर कोणत्याही पदार्थासोबत ठेचा खाता येतो. त्याची चव चाखायची असेल तर आता सोपी रेसिपीही जाणून घ्या.

ठेचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य कोणते?

8 ते 10 ताज्या हिरव्या मिरच्या 2 टेबलस्पून शेंगदाणा तेल लसणाच्या 6-8 पाकळ्या 3 टेबलस्पून शेंगदाणे 1/2 टीस्पून कोथिंबीर 1/2 टीस्पून जिरे मूठभर कोथिंबिरीची पाने मीठ चवीनुसार

ठेचा बनवण्याची पहिली पायरी

सर्वप्रथम एका कढईत शेंगदाण्याचे तेल गरम करावे लागेल. आता त्यात हिरवी मिरची आणि लसूण घालून मंद आचेवर एक मिनिट परतून घ्या. त्यानंतर त्यात जिरे, शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून सुगंध येईपर्यंत चांगले परतून घ्यावे. लक्षात ठेवा की आपल्याला सर्व काही हलके तळायचे आहे, जास्त शिजवू नका.

शेवटची पायरी

भाजल्यानंतर गॅस बंद करा. आता त्यात हिरवी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालावे. पेस्टल किंवा फूड प्रोसेसरमध्ये सर्व काही बारीक करून घ्या. बारीक करून तुम्ही गरमागरम सर्व्ह करू शकता.

ठेचा बनवण्याची अगदी सोपी पद्धत

हिरव्या मिरच्या आणि लसण हे दोन्ही थोडं तेल टाकून भाजून घ्या आणि खलबत्त्यात कुटा. झाला ठेचा. लक्षात घ्या की, मिक्सरमुळे मुळ चव जाते आणि ठेच्याची चव चाखायची तर त्यात फार गोष्टी घालत बसू नका. फक्त मिरची, लसून आणि मीठ इतकंच पुरेसं आहे.

ठेच्याची चव भल्याभल्यांना आवडते. ग्रामीण भागात अगदी साधा आणि चविष्ट ठेचा बनवतात. विशेष म्हणजे चुलीवर भाजलेल्या मिरच्यांचा ठेचाच वेगळा असतो. त्याची चव दुसरीकडे कुठेही नाही. कारण, चुलीवरच्या भाकरीची आणि ठेचाची चवच वेगळी आहे. तुम्हालाही जमल्यास तुम्ही एकदा ठेचा नक्की खावून पाहा. तुम्ही ठेचा खाल्ल्यास तो तुम्हाला पुन्हा पुन्हा खावा वाटेल. ठेचा आणि भाकरी इतकंच अनेकांना पुरेसं असतं. त्याची चवी जगात कुठेही नाही.

अखेर कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय, नराधमाला जन्मठेप अन्
अखेर कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय, नराधमाला जन्मठेप अन्.
सैफचा जीव वाचवणाऱ्या 'रियल लाइफ हिरो'ला मुंबईकरांचा असा सॅल्यूट
सैफचा जीव वाचवणाऱ्या 'रियल लाइफ हिरो'ला मुंबईकरांचा असा सॅल्यूट.
23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होणार,शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा
23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होणार,शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा.
'असं का ओरडला नाहीत?', मुंडेंच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राऊतांचा सवाल
'असं का ओरडला नाहीत?', मुंडेंच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राऊतांचा सवाल.
भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा नेता फडणवीसांना भेटला? सामंतांचा दावा
भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा नेता फडणवीसांना भेटला? सामंतांचा दावा.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार.
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं.
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'.
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला.
"मला भिती वाटते माझं वक्तव्य मोठं...ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आता"