AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरार फास्ट लोकलमधून उडी मारलेली, पण..; हृता दुर्गुळेच्या सासूचा खुलासा, सावत्र आईकडून सोसला छळ

हृता दुर्गुळेची सासू आणि प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शाह नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्यातील संघर्षाविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. यावेळी त्यांनी लहानपणीच्या कटू आठवणीही सांगितल्या आहेत.

विरार फास्ट लोकलमधून उडी मारलेली, पण..; हृता दुर्गुळेच्या सासूचा खुलासा, सावत्र आईकडून सोसला छळ
हृता दुर्गुळे, मुग्धा शाहImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 03, 2026 | 11:32 AM
Share

मराठमोठी अभिनेत्री हृता दुर्गुळेची सासू ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मुग्धा शाह यांनी विविध मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. पडद्यावर कधीकधी खलनायिका साकारणाऱ्या मुग्धा शाह या खऱ्या आयुष्यात मात्र एका चौकटीतच लहानाच्या मोठ्या झाल्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या त्यांच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. यावेळी त्यांनी एकदा विरार फास्ट लोकलमधून उडी मारल्याचाही धक्कादायक खुलासा केला आहे.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, “आज माझं वय 63 वर्षे आहे. तुम्ही 63 वर्षे मागे जाऊन पहा.. त्यावेळी महिला किंवा मुलींमध्ये एवढी हिंमत होती का, की ते स्वत:साठी भूमिका घेतील? मी दोन वेळा भूमिका घेतली आहे.. घरातून पळून जाण्याची.. आयुष्य संपवण्याची.. विरार फास्ट लोकलमधून मी उडी मारली होती. पण आज मी इथे जिवंत आहे. प्रयत्न केले, नाही असं नाही. दिवसभर बाहेर पळून गेले मी, पण रात्री जाणार कुठे? राहणार कुठे? रात्री घरीच येणार ना, त्यामुळे स्वत:साठी कधी स्टँड घेऊ शकले नाही. कदाचित त्याच वातावरणात मी वीस वर्षे काढली, त्यानंतर सासरी.. त्यामुळे मला माझा आवाज कधीच नव्हता.”

View this post on Instagram

A post shared by जाई (@jaaeekhandekar)

“मला माझी मतं मांडायची आहेत, हा प्रकार कधीच झाला नाही. आजच्या तारखेलाही मी बोलू शकत नाही. एखादी गोष्ट चुकीची आहे, हे मला माहीत आहे. पण मी बोलू शकत नाही. मी या इंडस्ट्रीत अभिनय करण्यासाठी, हिरोइन बनण्यासाठी किंवा पैसे कमावण्यासाठी आले नाही. मी लग्नानंतरही जेव्हा घरात पाहुणे यायचे तेव्हा किंचनच्या पडद्याआडून चहा घेऊन जायला सांगायची. कारण जडणघडणच तशी झाली नाही, तर कोणाशी बोलायची काय हिंमत करणार,” असा सवाल त्यांनी केला.

“माझा जन्म झाला तेव्हापासून मी सावत्र आईच्या हाताखाली होते. आज लोक माझ्यातली छळ करणारी खलनायिका बघतात. पण त्याहीपेक्षा वाईट माझं बालपण गेलंय. ‘आनंदी’ या मालिकेत जेव्हा मी तिचा छळ करणारे सीन्स करते, तेव्हा शूटिंगनंतर मी तिला घट्ट मिठी मारून रडते. कारण मला माझ्या लहानपणीच्या वेदना आठवतात”, अशा शब्दांत मुग्धा व्यक्त झाल्या. मुग्धा यांच्या आईचं निधन झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतरही त्यांनी बराच त्रास सहन केला. अखेर त्यांनी मुलांना घेऊन वेगळं राहण्याचा निर्णय घेतला.

Follow Us
पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!