छोट्या पुढारीवर मोठा आरोप, घनश्याम थेट म्हणाला, कितीही प्रामाणिक राहून…

Bigg boss marathi 5 : बिग बॉसचे हे सीजन चांगलेच धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. पुढील काही दिवस प्रेक्षकांना जबरदस्त मनोरंजन होणार हे तर स्पष्टच आहे. वर्षा उसगांवकर या देखील बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसत आहेत.

छोट्या पुढारीवर मोठा आरोप, घनश्याम थेट म्हणाला, कितीही प्रामाणिक राहून...
Ghanshyam Darode
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 1:43 PM

बिग बॉस मराठीच्या घरात मोठा हंगामा होताना दिसतोय. नुकताच बिग बॉसच्या घरात कडाक्याची भांडणे झाली. मुळात म्हणजे हे बिग बॉस मराठीचे हे सीजन तूफान चर्चेत आहे. बिग बॉस मराठी 5 च्या घरात एक टास्क झाला. सतत निर्माते हे घरातील सदस्यांना टास्क देताना दिसत आहेत. या टास्कमध्ये निकी तांबोळी यांच्या ग्रुपकडून घनश्याम दरोडे अर्थात छोट्या पुढारीला पाठवण्यात आले. यावेळी अंकिता आणि धनंजय पवार यांचा खोटेपणा उघडकीस आला. रितेश देशमुख याने घरातील काही सदस्यांना व्हिडीओ दाखवले. या व्हिडीओमध्ये घरातील लोक आपल्याबद्दल मागे काय बोलतात हे दाखवण्यात आले.

बिग बॉसच्या घरात गेल्या काही दिवसांपासून छोटा पुढारी आणि निकी तांबोळी यांच्यामध्ये खास मैत्री ही बघायला मिळतंय. विशेष म्हणजे निकी तांबोळी ही छोट्या पुढारीला आपला भाऊ मानते. घनश्यान हा देखील निकी तांबोळीला निकी ताई म्हणून हाक मारताना दिसतो. अंकिता आणि धनंजय पवार यांच्यामुळे या दोघांमध्ये वाद होताना दिसले.

हेच नाही तर निकी आणि छोट्या पुढारीमध्ये कडाक्याची भांडणे झाली. यावेळी निकी तांबोळी ही थेट म्हणते की, तू फेक आहेस आणि पहिल्या दिवसापासून तू फक्त आणि फक्त फेक वागत आहे. यावर छोटा पुढारी हा निकी तांबोळी हिला विचारताना दिसतोय  की, मी काय फेक वागलो सांग मला….यानंतर तिथून निघून जाण्यास निकी घनश्यामला सांगते.

छोटा पुढारी म्हणतो की, तुला मी बहिणी मानले आहे आणि तू असे बोलत आहे…मी शपथ घेऊन सांगतो की, मी काहीही फेक वागलो नाही किंवा तुमच्याबद्दल दुसऱ्या ग्रुपमधून जाऊन काहीही बोलला नाही. हे परत परत सांगताना छोटा पुढारी हा दिसला. मात्र, यावेळी निकी तांबोळी ही छोट्या पुढारीला सतत फेक असल्याचे म्हणताना दिसली.

नेहमीच छोट्या पुढारीवर आरोप केला जातो की, तो दोन्ही ग्रुपमध्ये जाऊन बसतो आणि इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे करतो. मात्र, अरबाज पटेल, निकी तांबोळी आणि जान्हवी यांच्यासोबत घनश्याम दरोडे हा प्रामाणिक वागताना दिसतोय. आता बिग बॉसच्या घरात मोठा हंगामा बघायला मिळणार आहे. निकी आणि अरबाजमध्ये मोठा वाद होणार आहे.

'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.