AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Huma Qureshi Cousin Murder: हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येप्रकरणी मोठा ट्विस्ट; या मुलीचं नाव आलं समोर

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गौतम आणि उज्ज्वल अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. हे दोघं सख्खे भाऊ आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उज्ज्वलनेच आसिफवर हल्ला केला होता. सध्या आरोपींची चौकशी सुरू आहे.

Huma Qureshi Cousin Murder: हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येप्रकरणी मोठा ट्विस्ट; या मुलीचं नाव आलं समोर
हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्याImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 08, 2025 | 9:58 AM
Share

गुरुवारी रात्री 11 वाजता दिल्लीजील निजामुद्दीन स्टेशनजवळ अत्यंत खळबळजनक घटना घडली. अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशीचं दोन तरुणांशी पार्किंगवरून भांडण झालं. स्कूटीच्या पार्किंगवरून झालेलं हे भांडण पुढे इतकं वाढलं की उज्ज्वल आणि गौतम या दोन तरुणांनी मिळून आसिफवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात आसिफ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी तिथे त्याला मृत घोषित केलं. याप्रकरणी आसिफच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे त्याच्यावर हल्ला करणाऱ्या उज्जव आणि गौतम या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघं सख्खे भाऊ असल्याचं कळतंय. या प्रकरणात आता एका मुलीचंही नाव समोर आलं आहे.

आसिफ कुरेशीच्या हत्येप्रकरणात आता शैली या मुलीचं नाव समोर आलं आहे. शैलीच्या सांगण्यावरूनच उज्ज्वल आणि गौतम यांनी आसिफवर हल्ला केल्याचं कळतंय. याप्रकरणी आता आसिफची पत्नी साइनाज कुरेशीचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. तिच्या मते, शेजाऱ्यांनी आधी आसिफला शिवीगाळ केली. आसिफ कामावरून परतला होता. तेव्हा त्याने शेजाऱ्यांना त्यांची स्कूटी समोरून हटवण्यास सांगितलं. याच क्षुल्लक गोष्टीवरून भांडण सुरू झालं. आसिफच्या पत्नीने असंही सांगितलंय की, शेजाऱ्यांशी त्यांचं नोव्हेंबर 2024 मध्येही भांडण झालं होतं. तर आसिफचा भाऊ जावेद आणि काका सलीम यांनी म्हटलंय की, अत्यंत क्षुल्लक गोष्टीवरून आरोपींनी आसिफवर निर्घृण हल्ला केला. त्यांना अत्यंत कठोर शिक्षा देण्याची मागणी आसिफच्या कुटुंबीयांनी केली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही आरोपी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आसिफच्या घरात घुसून त्याला मोठ्या दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आसिफच्या पत्नीने केला आहे. “त्यांनी नोव्हेंबरमध्येही त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एक मोठा दगड आणला होता. आमच्या घरात घुसून त्यांनी धमकी दिली होती”, असा खुलासा पत्नीने केला.

भोगल बाजार लेनमध्ये ही घटना घडली आहे. याविषयी पोलिसांनी सांगितलं, ‘अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याची निजामुद्दीन परिसरात दोन जणांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. मिळालेल्या तक्रारीनुसार, पार्किंगवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर उज्ज्वलने आसिफवर हल्ला केला. या हल्ल्यात आसिफचा मृत्यू झाला. आसिफचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आम्ही अहवालाची प्रतीक्षा करतोय.’

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.