Huma Qureshi Cousin Murder : पत्नीच्या डोळ्यासमोरच पतीची हत्या ! हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितल नेमकं काय घडलं !
माझे पती दरवाज्याजवळ उभे होते, शेजारच्या मुलाने त्याची स्कूटी गेटसमोर लावली. ते पाहून माझे पती त्याला म्हणाले, बाळा, गाडी थोडी पुढे उभी कर, रास्ता मोकळा राहील. ते ऐकून त्या मुलाने आरडाओरजा करत शिव्या दिल्या आणि धमकी देऊन तो गेला. थोड्याच वेळात तो परत आला आणि...

देशाची राजधानी दिल्लीत पार्किंगच्या वादातून झालेल्या हत्येने संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. आसिफ (वय 42) असे मृताचे नाव असून आहे, तो बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आहे. मात्र यामुळे संपूर् कुटुंब हादलं असून शोकाकुल आहेत. पण की ही केवळ भांडणातून झालेली हत्या नाही तर पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
कुटुंब आणि प्रत्यक्षदर्शींच्या मते, ही घटना रात्री 9:30 ते 10:00 च्या दरम्यान घडली. आसिफच्या पत्नीने सांगितले की, शेजारच्या एका तरुणाने त्यांच्या घरासमोर त्याची स्कूटर पार्क केली होती, त्यामुळे मुख्य गेट बंद होतं. त्याने त्या तरुणाला स्कूटर थोडी पुढे नेण्यास सांगितले, मात्र ते ऐकून तरूणाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि धमकी दिली की तो परत येईल आणि त्यांना बघून घेईल. थोड्या वेळाने तो तरूण त्याच्या भावासोबत परतला आणि त्याने आसिफवर थेट हल्ला केला. या लोकांनी पूर्वीही आसिफलवर हल्ला केला होता, असं कुटुंबियांनी सांगितलं.
हल्लेखोराच्या हातात धारदार शस्त्र होते, त्याच्या सहाय्याने त्या तरूणाने आसिफच्या छातीत वार केले, असा आरोप आहे. ही घटना इतक्या वेगाने घडली की आजूबाजूचे लोक सावरूही शकले नाहीत. अति रक्तस्त्रावामुळे आसिफ खाली कोसळला. कुटुंबियांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेलं पण तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
वहिनीचा फोन येताच घेतली धाव पण
आसिफचा भाऊ जावेदने माध्यमांशी बोलताना काही गोष्टी सांगितल्या. रात्री साडेदहा वाजता मला माझ्या वहिनीचा फोन आला की आसिफवर हल्ला झाला आहे आणि त्याची प्रकृती खूपच वाईट आहे. मी ताबडतोब दुकान सोडले आणि घरी धावलो. पण मी पोहोचेपर्यंत त्याचे निधन झाले होते. हा वाद फक्त पार्किंगवरून झाला होता, परंतु हल्लेखोरांनी यापूर्वीही याच मुद्द्यावरून त्याच्याशी दोन-तीन वेळा भांडण केलं होतं. हे प्रकरण अजून वाढू नये म्हणून त्याने यापूर्वी झालेल्या संघर्षांमध्ये पोलिसांकडे तक्रार केली नव्हती, असं जावेदने नमूद केलं.
वर्षभरापासून सुरू होता वाद
मात्र आसिफचे काका सलीम कुरेशी यांनी दावा केला की, हा हल्ला नियोजित होता. माझ्या पुतण्याने त्यांना सांगितलं की स्कूटी थोडी पुढे पार्क करा, दारात पार्क करू नका. मात्र एवढ्या मुद्यावरून दोघे आले आणि त्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर हल्ला चढवला. परिसरातील लोकांना माहिती आहे की गेल्या वर्षीही या लोकांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शेजाऱ्यांनी हस्तक्षेप केला होता. पण यावेळी त्यांनी आसिफला घेरलं आणि संधी मिळताच त्याची हत्या केली. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी सलीमने पोलिसांकडे केली आहे.
पत्नीने काय सांगितलं ?
या दुर्दैवी हत्येमुळे आसिफच्या पत्नीची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. मात्र तरीही तिने त्या रात्री काय घडलं याची संपूर्ण हकीकत सांगितली. ती म्हणाली, माझा नवरा दाराशी उभा होता. शेजारच्या एका मुलाने त्याची स्कूटी गेटसमोर उभी केली. माझ्या नवऱ्याने फक्त म्हटले, “बेटा, ती थोडी पुढे उभी कर म्हणजे रस्ता मोकळा राहील.” यावर, तो त्याला शिवीगाळ करत आणि धमकावत वरच्या मजल्यावर गेला. थोड्या वेळाने तो त्याच्या भावासोबत खाली आला आणि माझ्या पतीच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केले. रक्त येऊ लागले, मी माझ्या मेहुण्याला फोन केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. माझ्या पतीला इतकी खोल जखम झाली होती की रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याआधीही या लोकांनी मारण्याचा प्रयत्न केला होता, पण माझ्या पतीने ते सोडून देण्यास, प्रकरण मिटवण्यास सांगितले होते. आता त्याचा परिणाम असा झाला की मी विधवा झाले, असं रडत रडत आसिफची पत्नी म्हणाली . माझा पती चिकन पुरवण्याचे काम करायचा, तो कष्टाने घर चालवायचा. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी , जेणेकरून उद्या अशी वेल इतर कोणावरही येऊ नये, अशी मागणी त्याच्या पत्नीने केली.
शेजाऱ्यांची साक्ष
परिसरातील सर्वजण आसिफला एक मनमिळावू आणि मदत करणारा व्यक्ती म्हणून ओळखत होते. शेजारी रामवती म्हणाली की, तो मला ‘दादी’ म्हणायचा आणि माझा खूप आदर करायचा. तो दीड वर्षांपासून इथे राहत होता आणि कधीही कोणाशीही वाईट वागायचा नाही. फक्त दोन मिनिटांपूर्वी तो मुलांसोबत खेळत होता आणि काही वेळातच सर्व काही संपले. एक स्कूटर पार्क करण्यावरून वाद सुरू झाला होता, परंतु दोन्ही हल्लेखोरांचा राग जुना होता असं आणखी एका शेजाऱ्याने सांगितलं.
हत्येच्या या घटनेनंतर परिसरात तणाव पसरला,दहशतीचं वातावरण होतं. स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आरोपींची ओळख पटली आहे आणि लवकरच त्यांना अटक केली जाईल. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन आरोपींचा सहभाग होता, जे एकाच रस्त्यावर दोन घरांच्या अंतरावर राहतात. घटनेनंतर दोघेही फरार झाले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे.
