AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री होणार दुसऱ्यांदा आई?; व्हिडिओ शेअर करून दाखवले प्रेग्नेंसी किट

एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. तिने प्रेग्नेंसी किट असलेला एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे ती दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याचं म्हटलं जात आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री होणार दुसऱ्यांदा आई?; व्हिडिओ शेअर करून दाखवले प्रेग्नेंसी किट
| Updated on: Jan 01, 2025 | 4:46 PM
Share

बॉलिवूडमध्ये जसे लग्नाचे सिझन सुरु आहे त्याचपद्धतीने काही अभिनेत्रींनी गुड न्यूजही दिली आहे. जर काही अभिनेत्रींनी बाळाला जन्म दिला आहे. आता अजून एका अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. तिने प्रेग्नेंसी किट दाखवत ही न्यूज दिली आहे.

इलियानाने शेअर केली गुड न्यूज 

ही अभिनेत्री म्हणजे इलियाना डिक्रूझ. तिच्या नवीन वर्षाच्या पोस्टमध्ये पती मायकेल डोलनसह तिची दुसरी गर्भधारणा जाहीर करून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

अभिनेत्रीने 2024 मधील प्रत्येक महिन्याचे हायलाइट्स दर्शविणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. अशापद्धतीने तिने एक व्हिडीओ शेअर करत प्रेग्नेंसी किट दाखवलं आहे. या व्हिडीओमुळे चाहते नक्कीच चकित झाले आहे. दरम्यान हा व्हिडीओ पाहून चाहते अभिनेत्रीला शुभेच्छा देत आहेत.

इलियाना दुसऱ्यांदा आई होणार ?

अलीकडे, इलियानाने तिच्या इंस्टाग्रामवर 2024 चा एक व्हिडिओ शेअर केला आणि रीलमध्ये तिचा पती मायकेल आणि बाळ कोआ फिनिक्स डोलन यांचे फोटो आणि व्हिडीओ आहे.

‘ऑक्टोबर’ सेगमेंट असं म्हणत इलियानाने ही क्लिप टाकली आहे. या क्लिपमध्ये ती तिच्या गर्भधारणा चाचणीचे निकाल म्हणजे प्रेग्नेंसी किट कॅमेऱ्याला दाखवताना दिसत आहे. तसेच या किटवर ‘प्रेग्नंट’ शब्द स्पष्टपणे दिसत आहे.

पण नक्की हा व्हिडीओ 2025 मध्ये येणाऱ्या बाळाचे संकेत आहे की अजून काही हे मात्र स्पष्ट झालेलं नाहीये.  त्यामुळे अनेकांनी तिला दुसरी पोस्ट शेअर करून याबद्दल खुलासा करण्याची विनंती केली आहे.

व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हिडिओ शेअर करताना इलियानाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे “प्रेम, शांती. आशा आहे की 2025 मध्ये हे सर्व आणि बरेच काही असेल.” तिने व्हिडिओ अपलोड करताच नेटकऱ्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने विचारले आहे, “2025 मध्ये दुसरे बाळ येणार आहे का?” तर दुसऱ्याने लिहिले, “व्वा! पुन्हा अभिनंदन!” तसेच अनेक नेटकऱ्यांनी बऱ्याच कमेंटस् केल्या आहेत तसेच तिला अजून एका पोस्टद्वारे या बातमीची मोठी घोषणा करण्याची विनंतीही केली आहे.

इलियाना खाजगी आयुष्याबद्दल फार कमी वेळा व्यक्त होते.

अभिनेत्री इलियानाला तिचे खाजगी आयुष्य फार सांगायला आवडत नाही. तिने मायकेल डोलनशी गुपचूप लग्न केले आणि ऑगस्ट 2023 मध्ये तिने तिच्या पहिल्या मुलाचे कोआ फिनिक्स डोलनला जन्म दिला. अभिनेत्री अनेकदा तिच्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

तिचे वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीच्या झोतात फार येऊ नये, असंही अभिनेत्रीने वारंवार सांगितले आहे. तथापि, याआधी एका मुलाखतीत तिने सांगितले होते की तिला या प्रकरणात आपल्या जोडीदाराला सामील करणे सोयीचे वाटत नाही कारण लोक मूर्खपणाने बोलायला सुरवात करतात.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.