कचरा वेचणाऱ्या भावांना मिळाली ‘इंडियन आयडॉल’मध्ये गाण्याची संधी, लोकांनी केले तोंड भरून कौतुक!

छोट्या पडद्यावरचा अर्थात टीव्ही विश्वातला प्रसिद्ध सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’ने अनेक कलाकारांच्या कौशल्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

कचरा वेचणाऱ्या भावांना मिळाली ‘इंडियन आयडॉल’मध्ये गाण्याची संधी, लोकांनी केले तोंड भरून कौतुक!
हाफिज आणि हबीबुर
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 3:10 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरचा अर्थात टीव्ही विश्वातला प्रसिद्ध सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’ने अनेक कलाकारांच्या कौशल्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. अशा या मंचावर आणखी दोन प्रतिभावान कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी बोलावले होते, ज्यांना आधीच आपल्या कामाने सगळ्यांना प्रोत्साहित केले आहे. आपण दिल्लीमध्ये राहणा हाफिज (Hafiz) आणि हबीबुरबद्दल (habibur) बोलत आहोत. ही तीच मुले आहेत, ज्यांचा व्हिडीओ खुद्द आनंद महिंद्रा यांनीही शेअर केला होता (Indian Idol 12 contestant Hafiz and habibur amazing performance goes viral on social media).

कोण आहेत हे दोन भाऊ?

दिल्लीच्या न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये हाफिज आणि हबीबुर कचरा उचलण्याचे काम करतात. इंडियन आयडॉलच्या मंचाने या दोघांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी दिली. त्यांच्याविषयी बोलताना विशाल दादलानी म्हणाले की, ‘आनंद महिंद्राने या दोन कलाकारांचा व्हिडीओ शेअर केला तेव्हा बर्‍याच लोकांनी मला टॅग केले आणि त्यांना एकदा तरी स्टेजवर बोलवावे असे सांगितले. मग मी त्यांचा आवाज ऐकला आणि मला आश्चर्यच वाटले. या दोन्ही भावांचे तीन गायक जज आणि विशेष अथिती म्हणून आलेल्या ‘जग्गु दादा’ अर्थात अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी खूप कौतुक केले.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव!

(Indian Idol 12 contestant Hafiz and habibur amazing performance goes viral on social media)\

इंडियन आयडॉलमधून बोलावणे आल्यावर आता प्रत्येकजण सोशल मीडियावर हाफिज आणि हबीबुर यांना शुभेच्छा संदेश पाठवत आहे. एका वापरकर्त्याने दोन्ही भावांचे कौतुक करताना असे लिहिले की, ‘हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, जर आपल्याला काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असेल तर कोणतीही गोष्ट आपल्या मार्गात अडथळा ठरणार नाही.’ त्याच वेळी, दुसर्‍या व्यक्तीने लिहिले की, ‘प्रत्यक्षात या दोघांचे हे कौशल्ये त्यांची खरी ओळख आहे’. या व्यतिरिक्त इतर बर्‍याच वापरकर्त्यांनी हाफिज आणि हबीबुर यांच्या खास प्रतिभेचे कौतुक केले. हेच कारण आहे की, सध्या बरेच लोक त्यांच्या संघर्षाची कहाणी सोशल मीडियावर मोठ्या संख्येने शेअर करत आहेत (Indian Idol 12 contestant Hafiz and habibur amazing performance goes viral on social media).

आनंद महिंद्रा म्हणतात…

या दोन्ही भावांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना आनंद महिंद्राने लिहिले की, ‘त्यांची प्रतिभा अजूनही कच्ची आहे आणि त्यांना प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. संगीताच्या पुढील प्रशिक्षणासाठी मला आणि रोहितला त्यांना पाठींबा द्यावा असे वाटते. संध्याकाळच्या वेळी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी संगीत शिक्षक म्हणून काम करेल, असे कोणी दिल्लीमध्ये आहे का? कारण हे दोन भाऊ दिवसभर काम करत असतात.’ आनंद महिंद्राच्या या ट्विटनंतर दोन्ही भाऊ देशभरात चर्चेचा विषय बनले होते. त्यानंतर प्रत्येकजण त्यांच्याबद्दल चर्चा करत होता.

(Indian Idol 12 contestant Hafiz and habibur amazing performance goes viral on social media)\

हेही वाचा :

Marathi Serial : अरुंधती कसा सोडवणार मुलांच्या आयुष्यातील गुंता?, ‘आई कुठे काय करते’ मालिकेला नवं वळण

Suhana Khan | शाहरुखच्या लेकीची मित्र-मैत्रिणींसोबत धमाल पार्टी, पाहा सुहानाचा बोल्ड अंदाज!

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....