Anjali Gaikwad | ‘लिटील चॅम्प’ची विजेती मराठमोळी अंजली गायकवाड गाजवतेय ‘इंडियन आयडॉल 12’चा मंच, वाचा तिच्या प्रवासाबद्दल…

मुळची अहमदनगरची असणाऱ्या अंजलीने या आधीही अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या गायनाची चुणूक दाखवली आहे. इतकेच नव्हे तर, ‘सारेगमप’च्या लिटील चॅम्प पर्वाची ती विजेती देखील ठरली होती.

Anjali Gaikwad | ‘लिटील चॅम्प’ची विजेती मराठमोळी अंजली गायकवाड गाजवतेय ‘इंडियन आयडॉल 12’चा मंच, वाचा तिच्या प्रवासाबद्दल...
अंजली गायकवाड
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 12:32 PM

मुंबई : सध्या प्रसिद्ध कार्यक्रम ‘इंडियन आयडॉल’चा 12 सीझन (Indian Idol 12) सुरु आहे. या पर्वाने रसिक श्रोत्यांना चांगलीच भुरळ पडली आहे. या एकापेक्षा एक सरस स्पर्धकांमध्ये अहमदनगरची गायिक अंजली गायकवाड (Anjali Gaikwad) प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. मुळची अहमदनगरची असणाऱ्या अंजलीने या आधीही अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या गायनाची चुणूक दाखवली आहे. इतकेच नव्हे तर, ‘सारेगमप’च्या लिटील चॅम्प पर्वाची ती विजेती देखील ठरली होती. तीचा हा प्रवास अतिशय खडतर होता (Indian Idol 12 Fame singer Anjali Gaikwad journey).

‘सारेगमप’च्या लिटील चॅम्प या शोमध्ये अंजलीची बहीण नंदीनीनेही सहभाग घेतला होता. पण दुर्दैवाने ती शोच्या फिनालेपर्यंत पोहोचू शकली नव्हती. लिटील चॅम्पस शो सुरु झाला तेव्हापासून अंजली ही ‘टॉप 5’मध्ये होती. नेहा कक्कड, हिमेश रेशमिया आणि जावेद अली व्यतिरीक्त 30 सदस्यीय ज्युरींनी हा शो जज केला होता. याआधीही अंजलीने तिच्या बहिणीच्या साथीने ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमात बाजी मारली होती.

पाहा अंजलीचा व्हिडीओ

(Indian Idol 12 Fame singer Anjali Gaikwad journey)

वडिलच अंजलीचे गुरु

आपल्या संगीत प्रवासाविषयी सांगताना अंजली म्हणते, ‘माझ्या घरातच सुरुवातीपासून संगीतमय वातावरण होते. माझे वडीलच माझे गुरु आहेत. ते घरीच मुलांना गायनाचे धडे देतात. मी तीन वर्षांचे होते, तेव्हापासून संगीत ऐकत आणि समजून घेत होते. माझ्या वडिलांनी माझ्यातील कला ओळखली आणि त्यांनी स्वतःच मला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. माझी बहिण नंदिनी माझ्यापेक्षा २ वर्षांनी मोठी आहे. खरं सांगायचं तर मी माझ्या ताईला बघूनच या क्षेत्रात आले (Indian Idol 12 Fame singer Anjali Gaikwad journey).

6 स्पर्धकांना मागे टाकत अंजलीने पटकावलेला मानाचा किताब

जयपूर येथील एका स्टुडिओमध्ये ‘सारेगामापा’चा ग्रँड फिनाले पार पडला होता. या मध्ये अंजलीने 6 स्पर्धकांना मागे टाकत हा मानाचा किताब आपल्या नावे केला होता. या शोमध्ये एक नाही तर दोन स्पर्धकांना विजेता घोषित करण्‍यात आले होते. सारेगमपच्या शोच्या इतिहासात असे पहिल्यांदा घडले होते. अंजलीसोबतच श्रेयण भट्टाचार्य हाही लिटील चॅम्पसचा विजेता ठरला होता. फिनालेमध्ये श्रेयणने ‘हवाएं’, ‘सूरज डूबा’ आणि ‘जालिमा’ यासारखी गाणी गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले होते, तर अंजलीने ‘दीवानी मस्‍तानी’, ‘झल्‍ला वल्‍ला’ ‘मैं कोल्‍हापुर से आई हूं’ ही शानदार गाणी गायली होती.

वाईल्ड कार्ड इंट्री होती अंजली गायकवाड!

उल्लेखनीय म्हणजे, अंजलीने तिच्या सुमधुर आवाजाने अल्पावधीत सर्वांची मने जिंकली होती. वाईल्ड कार्ड इंट्री घेऊन आलेली नंदीनीने काही दिवसांतच स्वतःमधील टॅलेंट सगळ्यांना दाखवून दिले होते. शोमध्ये अंजलीची बहीण नंदिनी अगोदरच शोमधून आऊट झाली होती. आता अंजली ‘इंडियन आयडॉल 12’च्या मंचावर अंजली आपल्या गाण्याची चुणूक पुन्हा दाखवून देत आहे. आपल्याला गायनाने अंजलीने सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

(Indian Idol 12 Fame singer Anjali Gaikwad journey)

हेही वाचा :

Shashi Kapoor | ‘आवरा’मधून मनोरंजन विश्वात पदार्पण करणाऱ्या ‘हँडसम हंक’ शशी कपूर यांना ‘या’ निर्मात्याची वाटायची भीती, वाचा किस्सा…

Video | जान्हवी कपूर विसरा, जब्याच्या शालूचा ‘नदियो पार…’ अंदाज पाहा!

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.