Indian Idol 12 | क्वारंटाईन असलेल्या पवनदीपच्या आठवणीत अरुणिता व्याकूळ, म्हणाली ‘जेव्हा तो सोबत नव्हता…’

Harshada Bhirvandekar

|

Updated on: Apr 27, 2021 | 4:31 PM

या आठवड्यात स्पर्धक पवनदीप राजन (Pawandeep rajan) आणि आशिष कुलकर्णी (Ashish kulkarni) सोनी टीव्हीच्या सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’मध्ये पुन्हा एकदा धमाकेदार प्रवेश करणार आहेत.

Indian Idol 12 | क्वारंटाईन असलेल्या पवनदीपच्या आठवणीत अरुणिता व्याकूळ, म्हणाली ‘जेव्हा तो सोबत नव्हता...’
पवनदीप आणि अरुणिता

मुंबई : या आठवड्यात स्पर्धक पवनदीप राजन (Pawandeep rajan) आणि आशिष कुलकर्णी (Ashish kulkarni) सोनी टीव्हीच्या सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’मध्ये पुन्हा एकदा धमाकेदार प्रवेश करणार आहेत. पवनदीपला अचानक मंचावर आलेले पाहून अरुणिताचा अतिशय आनंद होणार आहे. इंडियन आयडॉलच्या यंदाच्या पर्वात अरुणिताचे नाव पवनदीपच्या नावाशी बर्‍याच वेळा जोडले गेले होते. पण दोघांनीही नेहमीच आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र असल्याचे म्हटले आहे. आणि म्हणूनच त्याचा मित्र कोरोनासारख्या महाभयंकर साथीच्या आजाराशी दोन हात घेऊन परत येत असल्याचा आनंद तिला झाला होता (Indian idol 12 Update Pawandeep Rajan And Ashish Kulkarni will return on Stage).

प्रेक्षकांची ही आवडती जोडी म्हणजेच गायक पवनदीप आणि त्याची मैत्रीण-स्पर्धक अरुणिता यांच्यासमवेत ‘प्यार हुआ मेरा दिल’  आणि ‘गाता रहे मेरा दिल’ गाण्यावर सुंदर रोमँटिक सादरीकरण करताना दिसणार आहे. त्यांच्या दमदार सदरीकरणाबद्दल परीक्षकांकडूनही त्यांना भरभरून कौतुकाची थाप मिळणार आहे. अनु मलिक, पवनदीप आणि अरुणिताला म्हणतील की, “मी तुमच्या दोघांच्या गायन प्रतिभेवर फिदा झालो आहे. तुम्ही भारतातील सर्वात मोठी प्रतिभा आहात. तुम्ही दोघांनाही आयुष्यात खूप यशस्वी व्हावे, अशी माझी इच्छा आहे. मला आशा आहे की आपण या संगीत उद्योगात चांगलेच नाव कमवाल.”

पाहा नवा परफॉर्मन्स

 (Indian idol 12 Update Pawandeep Rajan And Ashish Kulkarni will return on Stage)

पवनदीपला खूप मिस केले!

नंतर जेव्हा शोचे होस्ट आदित्य नारायण अरुणिताला पवनदीपचा परफॉर्मन्स किती मिस केला, हे विचारताना दिसेल. तेव्हा अरुणिता आदित्यच्या या प्रश्नाला उत्तर देत म्हणाली की, “होय, मी पवनदीपचा परफॉर्मन्स खूप मिस केला आहे/ कारण मी त्यांच्या गायनाची फॅन आहे. जेव्हा तो आमच्याबरोबर नव्हता, तेव्हा आम्ही त्याच्यासाठी जागा आरक्षित करायचो. या सर्वांनी असे वाटायचे की, या सर्व परफॉर्मन्सच्या वेळी तो आमच्यासोबत बसला आहे.”

अरुणिता पुढे म्हणाली की, ‘त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, परंतु जेव्हा जेव्हा आम्हाला त्याची आठवण येते तेव्हा आम्ही त्याचे गाण्याचे व्हिडीओ पाहतो. आम्ही आमच्या पार्टनर इन क्राईमला खूप मिस करत होतो. देव त्याला खूप बळ आणि उदंड आयुष्य देवो.’

(Indian idol 12 Update Pawandeep Rajan And Ashish Kulkarni will return on Stage)

हेही वाचा :

कोरोनामुक्त झालेल्या निक्की तंबोलीचा मोठा निर्णय, कोरोना रूग्णांसाठी करणार ‘अशी’ मदत!

PHOTO | ‘शेवंता’ रंगलीय नव्या ‘छंदात’, पाहा अपूर्वा नेमळेकर सध्या काय करतेय…

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI