Aditya Narayan | मदतीसाठी पुढे आलेले अनेक हात पाहून आदित्य भारावला, ‘कंगाल’ झाल्याचा दावा गायकाने फेटाळला!

आदित्य नारायणची आर्थिक परिस्थिती सध्या खालावली असून, त्याच्याकडे उदरनिर्वाहापुरते पैसेदेखील नसल्याचे वृत्त पसरले होते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:19 AM, 16 Oct 2020
Aditya Narayan | मदतीसाठी पुढे आलेले अनेक हात पाहून आदित्य भारावला, ‘कंगाल’ झाल्याचा दावा गायकाने फेटाळला!

मुंबई : गायक-अभिनेता आदित्य नारायणची (Aditya Narayan) आर्थिक परिस्थिती सध्या खालावली असून, त्याच्याकडे उदरनिर्वाहापुरते पैसेदेखील नसल्याचे वृत्त पसरले होते. यानंतर आदित्यच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले. त्याला अनेकांनी फोन करून, मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, या सगळ्या प्रकाराबद्दल आदित्य नारायणला काहीच कल्पना नव्हती. माध्यमांमधील वृत्त पाहताच त्याला सगळी परिस्थिती लक्षात आली. मात्र, यानंतर त्याने सदर वृत्त खोटे असल्याचे म्हणत, कंगाल झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. (Indian Idol Host Aditya Narayan denied news that he is bankrupt)

आदित्य नारायणने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, ‘या लॉकडाऊनचा फटका जसा इतरांना बसला आहे, तसाच मलाही बसला आहे. तब्बल 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ काम नसल्याने आर्थिक चणचण होती. मात्र आपण कंगाल झालो किंवा कुठलीही वस्तू विकणार असल्याचे वृत्त पूर्णपणे तथ्यहीन आहे. असे काहीच झालेले नाही.’

माध्यमांच्या या वृत्तानंतर आदित्य नारायणचा फोन मदतीसाठी दिवसभर खणखणत होता. याविषयी सांगताना तो म्हणाला की, ‘मी कंगाल झाल्याची बातमी पाहिल्यानंतर अनेकांचे मला फोन, मेसेजेस आले. प्रत्येकाने मला मदत करण्याची इच्छा बोलून दाखवली. इंडस्ट्रीतल्या अनेकांनीही फोन करून कामाविषयी विचारणा केली. त्यांचे माझ्यावरील प्रेम पाहून मी खरंच भारावून गेलो आहे.’ याचबरोबर त्याने, ‘कुठलीही काळजी करू नका. मी एकदम मजेत आहे आणि अशी कुठलीही परिस्थिती माझ्यावर ओढवलेली नाही. तुम्हा सगळ्यांचे प्रेम असेच राहू द्या’, असे म्हणत सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. (Indian Idol Host Aditya Narayan denied news that he is bankrupt)

 

View this post on Instagram

 

😆

A post shared by Aditya Narayan (@adityanarayanofficial) on

अकाऊंटमध्ये केवळ इतकेच रुपये शिल्लक असल्याचा दावा

‘इंडियन आयडॉलचा होस्ट असणाऱ्या आदित्य नारायण याच्या बँक खात्यात केवळ 18 हजार रुपये शिल्लक आहेत. असेच सुरू राहिले, तर उदरनिर्वाहासाठी त्याला आपली बाईक विकावी लागणार आहे. सरकारने जर लॉकडाऊन हटवले नाही, तर अशीच लोकांची उपासमार होणार आहे. माझीही सगळी बचत आता संपली आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवलेले पैसेदेखील मी काढून घेतले आहेत’, असे आदित्यने एका मुलाखती दरम्यान सांगितल्याचे वृत्त पसरले होते.

नुकतीच केली लग्नाची घोषणा

आदित्य नारायण (Aditya Narayan) त्याची सह-अभिनेत्री श्वेता अग्रवालशी विवाह बंधनात अडकणार असल्याची घोषणा केली होती. श्वेताने आदित्यसोबत ‘शापित’ या चित्रपटात काम केले होते. 10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सेटवरच आदित्य आणि श्वेताची ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आता 10 वर्षांनी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. या वर्षाच्या अखेरीस, नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान त्यांचा विवाह सोहळा पार पडणार असल्याचे त्याने म्हटले होते.

(Indian Idol Host Aditya Narayan denied news that he is bankrupt)

संबंधित बातम्या : 

Aditya Narayan | गायक आदित्य नारायण आर्थिक अडचणीत, पैशांसाठी ‘बाईक’ विकण्याची वेळ!

गायक आदित्य नारायण बोहल्यावर चढणार, ‘या’ अभिनेत्रीशी लग्नगाठ बांधणार!