Aditya Narayan | गायक आदित्य नारायण आर्थिक अडचणीत, पैशांसाठी ‘बाईक’ विकण्याची वेळ!

इंडियन आयडॉलचा होस्ट असणाऱ्या आदित्य नारायण याच्या बँक खात्यात केवळ 18 हजार रुपये शिल्लक असल्याचे त्याने म्हटले आहे.

Aditya Narayan | गायक आदित्य नारायण आर्थिक अडचणीत, पैशांसाठी ‘बाईक’ विकण्याची वेळ!

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेता-गायक आदित्य नारायणने (Aditya Narayan) प्रेमात पडल्याची कबुली देत, लवकरच लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. अभिनेत्री श्वेता अग्रवालसह 10 वर्ष नात्यात राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. यामुळे आदित्य चर्चेत आला होता. परंतु, पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणामुळे आदित्य नारायण प्रसिद्धी झोतात आला आहे. आर्थिक तंगीमुळे (Financial Crisis) ‘बाईक’ विकावी लागणार असल्याचे त्याने म्हटले आहे.( Indian Idol Host Singer Aditya Narayan in financial crisis)

अकाऊंटमध्ये केवळ इतकेच रुपये शिल्लक

इंडियन आयडॉलचा होस्ट असणाऱ्या आदित्य नारायण याच्या बँक खात्यात केवळ 18 हजार रुपये शिल्लक आहेत. असेच सुरू राहिले, तर उदरनिर्वाहासाठी त्याला आपली बाईक विकावी लागेल, असे आदित्य म्हणाला. एका मुलाखती दरम्यान त्याने हा गौप्यस्फोट केला आहे. आदित्य म्हणाला, ‘सरकारने जर लॉकडाऊन हटवले नाही, तर अशीच लोकांची उपासमार होणार आहे. माझीही सगळी बचत आता संपली आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवलेले पैसेदेखील मी काढून घेतले आहेत.

आर्थिक तंगीने हैराण

‘आपण एक वर्ष काम करणार नाही, असे कधीच वाटले नाही. माझ्या खात्यात 18,000 रुपये शिल्लक आहेत. जर ऑक्टोबरपर्यंत काम सुरू केले नाही तर, माझ्याकडे पैसेच उरणार नाहीत. उदरनिर्वाहासाठी मला माझी बाईक किंवा एखादी वस्तू विकावी लागेल. हे खरोखर कठीण आहे’, असे म्हणत त्याने आपले दुःख व्यक्त केले आहे. (Indian Idol Host Singer Aditya Narayan in financial crisis)

View this post on Instagram

आरंभ! #IIndianIdol @sonytvofficial @thecontentteamofficial @fremantleindia

A post shared by Aditya Narayan (@adityanarayanofficial) on

नुकतीच केली लग्नाची घोषणा

आदित्य नारायण त्याची सह-अभिनेत्री श्वेता अग्रवालशी विवाह बंधनात अडकणार असल्याची घोषणा केली होती. श्वेताने आदित्यसोबत ‘शापित’ या चित्रपटात काम केले होते. 10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सेटवरच आदित्य आणि श्वेताची ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आता 10 वर्षांनी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. या वर्षाच्या अखेरीस, नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान त्यांचा विवाह सोहळा पार पडणार असल्याचे त्याने म्हटले होते.

याबद्दल बोलताना आदित्य म्हणाला, ‘शापितच्या सेटवर माझी आणि श्वेताची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत आमची छान मैत्री झाली होती. मात्र, काही काळाने आपण तिच्यावर प्रेम करू लागलो आहोत, याची जाणीव मला झाली. मी तिला याबद्दल कल्पनादेखील दिली होती. मात्र, त्यावेळी आम्ही दोघेही करिअरमध्ये सेटल होण्याचा प्रयत्न करत असल्याने, प्रेमाऐवजी मैत्रीच्या नात्याला अधिक प्राधान्य दिले.’

(Indian Idol Host Singer Aditya Narayan in financial crisis)

Published On - 3:40 pm, Thu, 15 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI