शाहिद कपूरऐवजी मीराचा दुसर्‍या व्यक्तीसोबत व्हॅलेंटाईन डे जल्लोषात!

खरंतर प्रेमाचा असा काही ठराविक दिवस नसतो. मात्र, आज म्हणजे 14 फेब्रुवारी जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो.

शाहिद कपूरऐवजी मीराचा दुसर्‍या व्यक्तीसोबत व्हॅलेंटाईन डे जल्लोषात!

मुंबई : खरंतर प्रेमाचा असा काही ठराविक दिवस नसतो. मात्र, आज म्हणजे 14 फेब्रुवारी जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. शाहिद कपूरची (Shahid Kapoor) पत्नी मीरा राजपूतनेही (Meera Rajput) व्हॅलेंटाईन डे साजरा केला आहे मात्र, तिने हा व्हॅलेंटाईन डे शाहिद कपूरसोबत साजरा केला नसून दुसऱ्या व्यक्तीसोबत साजरा केला आहे. ऐकून धक्का बसला ना…होय हे खरं आहे. (Instead of Shahid Kapoor, Meera Rajput celebrated Valentine’s Day with another person)

मीराने आपला व्हॅलेंटाईन डे लहापणीपासूनची मैत्रिणीसोबत केला आहे. मीराने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.  फोटो खूप जुना दिसत आहे, या फोटोमध्ये तिची मैत्रिण सेजल कुकरेजा आहे. हा फोटो शेअर करताना मीराने लिहिले आहे की, सेजल तु माझी खूप चांगली मैत्रिण आहेस जेंव्हा जेंव्हा मी काही संकटामध्ये अडकते त्यावेळी तुच मला त्या परिस्थितीमधून बाहेर काढते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

आपण एक वर्षांनंतर तुझ्या लग्नात भेटणार आहोत आणि व्हॅलेंटाईन डेनिमित्त आशा करते की, आपले प्रेम आणि मैत्री अशीच फुलत जावो. मीरा चित्रपटांपासून दूर आहे पण ती बर्‍याचवेळा स्टाईल आणि तिच्या फॅशनमुळे चर्चेत येते. मीरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. मीरा सोशल मीडियावर नेहमीच काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

शाहिद कपूर सध्या आपल्या आगामी जर्सी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, शशांक खेतान निर्देशित आणि धर्मा प्रोडक्शन निर्मित ‘योद्धा’ (Yodha) चित्रपटात शाहिद कपूर दिसणार नाही असे म्हटले जात आहे की, स्वत: शाहिद कपूरने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. शाहिदसोबत दिशा पाटनी या चित्रपटात त्यांच्यासोबत दिसणार होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

मीडिया रिपोर्टनुसार शाहिद कपूर जर्सीचे शूटिंग पूर्ण होताच या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार होता, पण शाहिदनेच चित्रपटास नकार दिला आहे. कबीर सिंहनंतर शाहिद कपूरने त्याची फी वाढविली आहे. ज्यामुळे तो चित्रपटाच्या स्टोरीवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. योद्धा चित्रपटातील काही भाग बदलावा अशी शाहिदची इच्छा होती. परंतु, चित्रपटाच्या निर्मात्यांना ते मान्य नव्हते. ज्यामुळे शाहिद कपूरने या चित्रपटापासून दूर गेला.

संबंधित बातम्या : 

आमिरच्या लेकीचा रोमँटिक व्हॅलेंटाईन, बॉयफ्रेंडसोबत शेअर केला खास व्हिडिओ!

Karnan | ‘कर्णन’चा फर्स्ट लूक आला; धनुषकडून चित्रपटाची तारीख जाहीर!

व्हॅलेंटाईन डेचं धुमशान; अंकिता लोखंडे आणि विकी जैन शिमलामध्ये!

(Instead of Shahid Kapoor, Meera Rajput celebrated Valentine’s Day with another person)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI