वडील भारतीय, आई विदेशी, स्वत: बनली दुसरी पत्नी… वडील-पतीने केली दोन लग्नं, कोण आहे ती ?
या अभिनेत्रीने एका अभिनेत्याशी लग्न केलं आणि ती त्याची दुसरी पत्नी बनली. लग्नानंतरही आज ती आई-वडील दोघांचाही प्रेमाने सांभाळ करते. कोण आहे ती अभिनेत्री ?

मल्याळम चित्रपटात काम करणारी ही तरुण, सुंदर अभिनेत्री भारतीयांपेक्षा परदेशी स्त्रीसारखी दिसते अशी शंका काही वर्षांपूर्वी, अनेकांना होती. मात्र तीच शंका खरी ठरली. कारण या सौंदर्यवती अभिनेत्रीचे वडील भारतीय असले तरी तिची तिची आई आयरिश आहे. मल्याळम चित्रपटात सुरेश गोपींच्या नायिकेच्या भूमिकेत तिने पदार्पण केले तेव्हा ती अवघ्या 23 वर्षांची होती. मात्र नंतर हीच अभिनेत्री, ही अभिनेत्री दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचा एक महत्त्वाचा भाग बनली. आता जरी ती मोठया प़डद्यावर कार्यरत नसली तरी ती एका प्रमुख दक्षिण भारतीय अभिनेत्याची पत्नी आणि त्याच्या मुलाची आई आहे. अनेक वर्षांनी ती तिच्या जीवनातील फारशा माहित नसलेल्या पैलूंबद्दल व्यक्त झाली.
कोण आहे ती अभिनेत्री ?
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तिचं नावं अमला आहे. जी आज अमला अक्किनेनी नावाने ओळखली जाते. नागार्जुन यांची ती द्वितीय पत्नी आहे. “एंटे सूर्यपुत्रिक्कु” या चित्रपटात नायिका म्हणून काम करणारी ही धाडसी तरूणी पाहून, त्यावेळी समाजातील अनेक प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अमला अक्किनेनीने माया विनोदिनीची भूमिका केली होती. अमलाने श्रीविद्येच्या वसुंधरा देवीच्या मुलीची भूमिका साकारली होती. एन्ते सूर्यपुत्रिकु या चित्रपटात एका तरुणीच्या मानसिक संघर्षांचे आणि तिच्या पालकांबद्दल काहीच माहिती नसलेल्या जीवनाचे चित्रण दाखवले होते.
खासगी आयुष्य
अमलाच्या वैयक्तिक आयुष्य बरचं चर्चेत असतं. तिने प्रसिद्ध अभिनेता नागार्जुनशी लग्न केलं, हे त्याचं दुसरं लग्न होतं. त्यांना अखिल अक्किनेनी नावाचा मुलगा आहे. ती नागार्जुनची दुसरी पत्नी आहे. त्याला पहिल्या लग्नापासूनचा एक मुलगा आहे, तो म्हणजे प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य. अमालाने अलीकडेच सोशल मीडियावर तिची विदेशी आई आणि बंगालमधील वडिलांच्या आयुष्याबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत.
“अवल विकटन” या यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत अमला अक्किनेनीने खुलासा केला की तिच्या पालकांचा घटस्फोट झाला होता आणि तिच्या वडिलांनी पुन्हा दुसरं लग्न केले. अमला अक्किनेनीचे वडील नौदलात अधिकारी होते आणि तिने उत्तर प्रदेशात शिक्षण घेतले. घटस्फोटानंतरही तिची आई अमलासोबतच राहिली. अमलाने तिच्या आईची खूप काळजी घेतली असून तिने तिच्यासाठी एक घरही विकत घेतले. अमला तिच्या आईच्या खूप निकट आहेय तिची आई आता अला आणि तिचा पती नागार्जुनसोबत राहते.
