AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar : राष्ट्रीय सुरक्षेला ‘धुरंधर’चा धोका? हायकोर्टाचे मंत्रालयाला चौकशीचे निर्देश, काय आहे प्रकरण?

दिल्ली उच्च न्यायालयाने लष्करी जवानाने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी केली. यादरम्यान माहिती व प्रसारण मंत्रालय आणि सेन्सॉर बोर्डाला 'धुरंधर' या चित्रपटातील काही दृश्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. नेमकं काय घडलं, ते सविस्तर वाचा..

Dhurandhar : राष्ट्रीय सुरक्षेला 'धुरंधर'चा धोका? हायकोर्टाचे मंत्रालयाला चौकशीचे निर्देश, काय आहे प्रकरण?
DhurandharImage Credit source: Instagram
| Updated on: May 20, 2026 | 3:05 PM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाविरोधात एका लष्करी जवावाने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला आणि सेन्सॉर बोर्डाला (CBFC) या चित्रपटातील काही दृश्यांबद्दल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘धुरंधर’मध्ये दाखवण्यात आलेल्या काही सीन्सवरून या याचिकेत राष्ट्रीय सुरक्षासंबंधी चिंता व्यक्त करण्यात आल्या होत्या. याचिकाकर्त्याने उपस्थित केलेले मुद्द विचार करण्यायोग्य आहे आणि या प्रकरणाकडे योग्य पद्धतीने लक्ष देणं आवश्यक असल्याचं कोर्टाने म्हटलंय.

नेमकं काय घडलं?

‘धुरंधर’ या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केल्यानंतर संबंधित लष्करी जवान सुनावणीदरम्यान स्वत: न्यायालयात उपस्थित होता. यावेळी जवानाने असा दावा केली, या चित्रपटातील काही दृश्ये, ज्यामध्ये लष्कर आणि सुरक्षा दलांद्वारे वापरल्या जाणाऱ्या डावपेचांचं, कार्यपद्धतींचं आणि संवदेनशील ठिकाणांचं अत्यंत स्पष्टपणे चित्रण केलं आहे. ही बाब राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे. याचिकाकर्त्याने असाही युक्तीवाद केला की, जरी या चित्रपटाला काल्पनिक म्हटलं जात असलं तरी त्यातील अशी दृश्ये राष्ट्राच्या सुरक्षेच्या हिताची मानली जाऊ शकत नाहीत. हे चित्रण राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण करतं.

न्यायालयाने काय म्हटलंय?

याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने टिप्पणी केली की, चित्रपटांचा प्रभाव फक्त मनोरंजनापर्यंतच मर्यादित राहत नाही. यावेळी खंडपीठाने उदाहरण देत सांगितलं की जर एखाद्या चित्रपटात आत्महत्येपूर्वी ऑनलाइन सर्चसारखे सीन्स सविस्तरपणे दाखवले गेले, तर त्यावरून प्रश्न उपस्थित होतो की असं चित्रण योग्य आहे का? चित्रपटांच्या प्रभावाला नाकारलं जाऊ शकत नाही. याचसाठी सेन्सॉरशिप आणि मार्गदर्शक तत्त्वांची गरज असते.

याचिकाकर्त्याने यावेळी न्यायालयाला असंही कळवलं की, त्याने 23 मार्च 2026 रोजी माहिती व प्रसारण मंत्रालय आणि सेन्सॉर बोर्ड यांना चित्रपटातील अनेक दृश्यांवर आक्षेप घेत एक सविस्तर निवेदन पाठवलं होतं. त्याचप्रमाणे या मुद्द्यावरून त्याने सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. कोर्टाने दिलेल्या आदेशात असं म्हटलंय की, सक्षम प्राधिकरणाने या प्रकरणाचा विचार करावा आणि आवश्यक वाटल्यास सुधारात्मक कारवाई करावी. त्याचसोबत घेतलेला निर्णय याचिकाकर्त्याला कळवावा.

रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर’ हा पहिला भाग डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात 1307.35 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहेत. आतापर्यंत त्याची भारतातील कमाई 1146.35 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 1700 कोटी रुपयांवर गेला आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला