मुंबई- बॉलिवूड इंडस्ट्रीतून सध्या एकानंतर एक ‘गुड न्यूज’ मिळत आहेत. आधी अभिनेत्री आलिया भट्टने मुलीला जन्म दिला. तर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री बिपाशा बासूला कन्यारत्न प्राप्त झालं. आता कतरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. या चर्चांमागचं कारण म्हणजे कतरिनाचा व्हायरल झालेला फोटो. या फोटोमध्ये तिचा बेबी बंप पहायला मिळतोय. म्हणूनच कतरिना प्रेग्नंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.