Happy Birthday Mandira Bedi : ‘इट्स माय बर्थडे’…मंदिरा बेदीनं शेअर केला स्पेशल व्हिडीओ, पाहा हॉट अवतार

मंदिरा बेदीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक बर्थडे स्पेशल व्हिडीओ शेअर केला आहे. (Mandira Bedi's Birthday Special hot Video)

  • Updated On - 4:43 pm, Thu, 15 April 21
Happy Birthday Mandira Bedi : ‘इट्स माय बर्थडे’…मंदिरा बेदीनं शेअर केला स्पेशल व्हिडीओ, पाहा हॉट अवतार

मुंबई : छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत अभिनेत्री मंदिरा बेदीने (Mandira Bedi) अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. आज 15 एप्रिल रोजी मंदिरा आपला वाढदिवस साजरा करत आहे. मंदिरा बेदी एक चांगली अभिनेत्री तसेच, एक प्रसिद्ध टीव्ही अँकर आहे. नुकतंच वाढदिवस साजरा करत तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. अर्थात नेहमी हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसणाऱ्या मंदिरा बेदीचा या व्हिडीओमध्येही तसाच अवतार पाहायला मिळतोय.

पाहा मंदिरा बेदीचा हा बर्थ डे स्पेशल व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

या व्हिडीओला ‘It’s My Birthday’ हे गाणं लावण्यात आलं आहे. सोबतच या व्हिडीओत मंदिरा गुलाबी रंगाच्या बिकिनीत दिसतेय. घरातच हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. मंदिरासोबतच या व्हिडीओमध्ये तिच्या मैत्रिणी देखील आहेत. ‘#nocaptionneeded 🧿😅 #reelkarofeelkaro’ असं कॅप्शन देत तिनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कमालीची हॉट दिसतेय. खूप कमी वेळात तिचा हा व्हिडीओ अनेक चाहत्यांनी लाईक केला आहे.

दूरदर्शनवरील ‘शांती’ कार्यक्रमातून कारकिर्दीची सुरूवात

मंदिरा बेदी हिने 1994मध्ये दूरदर्शन ‘शांती’ कार्यक्रमातून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. या मालिकेत मंदिरा बेदीच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. आजही चाहते ‘शांती’मुळे मंदिराला ओळखतात. यानंतर मंदिरा बेदी यांनी ‘आहट’, ‘औरत’, ‘घर जमाई’, ‘क्यूं की सास भी कभी बहु थी’ आणि ’24’ मध्ये काम केले आहे. मंदिरा बेदी यांनी 1999मध्ये दिग्दर्शक राज कौशलशी लग्न केले होते. लग्नाच्या सुमारे 12 वर्षानंतर मंदिराने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर ती खूप चर्चेत आली होती. गरोदरपणात एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली की, जेव्हा मी 39 वर्षांची होते, तेव्हा मला मुलगा झाला, ज्यात माझ्या पतीने मला खूप सहकार्य केले. मंदिरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि तिची फॅन फॉलोईंगही चांगली आहे. पण, मंदिराच्या बोल्ड आणि हॉट स्टाईलसाठी ओळखली जाणारी मंदिरा बोल्डनेसपेक्षाही एक चांगली अभिनेत्री आहे.

मुलीला घेतले दत्तक

मंदिराने तिच्या कारकिर्दीतील अनेक चर्चित चित्रपटातही काम केले होते. अभिनेत्री आपल्या होस्टिंगसाठी देखील ओळखली जाते मंदिरा ही आज एका मुलीची देखील आई असून, तिने त्या मुलीला दत्तक घेतले आहे. तिचे आपल्या मुलीवरसुद्धा खूप प्रेम आहे.

संबंधित बातम्या 

PHOTO | मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर बोल्ड अंदाज, अभिनेत्री आरती सिंहच्या बिकिनी फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

Happy Birthday Mandira Bedi | लग्नाच्या 12 वर्षानंतर आई बनली मंदिरा बेदी, फिटनेस-बोल्डनेसच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींनाही देते टक्कर!

Published On - 4:43 pm, Thu, 15 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI