AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jana Nayagan : ‘जन नायकन’साठी थिएटर्समध्ये चाहत्यांचा धुमाकूळ; कुठे दुग्धाभिषेक तर कुठे आतषबाजी

थलपती विजय यांच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट 'जन नायकन' बऱ्याच प्रतीक्षेनंतर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा दिवस त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या सण-उत्सवापेक्षा कमी नाही. अनेक ठिकाणी लेझर शो, ड्रोन शो आयोजित करण्यात आले आहेत.

Jana Nayagan : 'जन नायकन'साठी थिएटर्समध्ये चाहत्यांचा धुमाकूळ; कुठे दुग्धाभिषेक तर कुठे आतषबाजी
थलपती विजय यांचा चित्रपट प्रदर्शितImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 23, 2026 | 11:56 AM
Share

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि साऊथ सुपरस्टार थलपती विजय यांच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर ही प्रतीक्षा संपताच चाहत्यांनी एखाद्या उत्सवाप्रमाणेच आनंद साजरा केला आहे. ‘जन नायकन’च्या प्रदर्शनाचा दिवस हा जणू एखाद्या सणाप्रमाणेच तमिळनाडूमध्ये साजरा केला जात आहे. संपूर्ण तमिळनाडूत या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता पहायला मिळतेय. अनेक ठिकाणी थिएटर्सबाहेर डान्स, लेझर शो, ड्रोन शो आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. चाहत्यांसोबतच विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा हा आनंद धूमधडाक्यात साजरा करत आहेत. या सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘जन नायकन’ हा थलपती विजय यांच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वीच त्यांनी ही गोष्ट जाहीर केली होती. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हा एक भावनिक क्षणसुद्धा आहे. चेन्नईच्या वूडलँड्स आणि कसिनो यांसारख्या थिएटर्समध्ये प्रदर्शनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. तर रात्री लेझर शो आणि ड्रोन शो आयोजित करण्यात आले होते. काही ठिकाणी ढोल वाजवत, नृत्य करत चाहत्यांनी हा आनंद साजरा केला.

पहा व्हिडीओ-

तमिळनाडूचे परिवहन मंत्री विजय तामिळन पार्थिबन म्हणाले की, ‘जन नायकनचं प्रदर्शन हे दिवाळी आणि पोंगलपेक्षा कमी नाही. या चित्रपटातील माझी छोटीशी भूमिका हा माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहे.’ तर टीव्हीकेचे आमदार के. व्ही. विजयधामू म्हणाले की, ते एक आमदार म्हणून नाही तर एक सामान्य चाहता म्हणून या चित्रपटाचा आनंद घेतील. यावेळी त्यांनी अशीही घोषणा केली की, चेन्नईमधील जवळपास 100 लोकांना हेल्मेट वाटण्यात येतील. दक्षिणेतल्या राज्यातील परंपरेनुसार, अनेक ठिकाणी थलपती विजय यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करण्यात आला, अन्नदान करण्यात आलं. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. तर सकाळपासूनच थिएटर्सबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. एच. विनोद दिग्दर्शित ‘जन नायकन’ या चित्रपटात थलपती विजय यांच्यासोबतच पूजा हेगडे, बॉबी देओल, मामिता बैजू, गौतम मेनन, प्रकाश राज आणि नारायण यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Follow Us
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला..
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला...
रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद
रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा!
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा! नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके म्हणाले..
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके बोलता बोलता हे काय म्हणाले?
MNS | मनसेच्या इशाऱ्यानंतर गणेशोत्सवाला परीक्षा न घेता मुलांना सुट्टी
MNS | मनसेच्या इशाऱ्यानंतर गणेशोत्सवाला परीक्षा न घेता मुलांना सुट्टी जाहीर
जालन्यात गुटख्यावर मोठी कारवाई; 1 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त
जालन्यात गुटख्यावर मोठी कारवाई; 1 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त
भाजप-शिंदे गटात ऑल इज नॉट वेल! दोन्ही पक्षांकडून सभात्याग
Mumbai | भाजप-शिंदे गटात ऑल इज नॉट वेल! समन्वय समिती निष्फळ; दोन्ही पक्षांकडून सभात्याग
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला यायला लाज वाटतेय, कारण... नितीन गड
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला यायला लाज वाटतेय, कारण... नितीन गडकरींचं पुन्हा मोठं विधान
पाऊस गायब अन् सोयाबीन उद्ध्वस्त! अकोल्यात शेतकऱ्याने शेतात सोडली गुरं
Akola | पाऊस गायब अन् सोयाबीन उद्ध्वस्त! अकोल्यात शेतकऱ्याने 4 एकर शेतात सोडली गुरं; अकोल्यात बळीराजा हताश
पाऊस पडतोय तरी पाणीटंचाई का? मुंब्र्यात पाण्यासाठी MIMचा संताप
MIM Protest In Thane | पाऊस पडतोय तरी पाणीटंचाई का? मुंब्र्यात पाण्यासाठी MIMचा संताप; ठाणे महापालिकेसमोर मडकी फोडत निषेध