जान्हवी कपूरसोबत खास फोटो पोस्ट करत माजी मुख्यमंत्र्यांचा नातू म्हणाला…
Janhvi Kapoor rumored Boyfriend Shikhar Pahariya: मजी मुख्यमंत्र्यांची सून होणार जान्हवी कपूर? माजी मुख्यमंत्र्यांचा नातवासोबत अभिनेत्रीचा खास फोटो तुफान व्हायरल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या फोटोंची चर्चा...

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया याला डेट करत आहे. शिखर आणि जान्हवी यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. पण अद्याप दोघांनी देखली सर्वांसमोर त्यांच्या नात्याचा स्वीकार आणि अधिकृत घोषणा केलेली नाही. आता देखील दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये जान्हवी आणि शिखर त्यांच्या पेटसोबत दिसत आहेत.
जान्हवी कपूर हिच्या वाढदिवसानिमित्त शिखर याने खास फोटो पोस्ट करत अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सध्या जान्हवी आणि शिखर यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, दोघांनी अद्याप नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण सोशल मीडियावर दोघे एकमेकांना कायम सपोर्ट करताना दिसतात.

जान्हवी आणि शिखर यांचं रिलेशनशिप
जान्हवी आणि शिखर गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत असतात. चाहत्यांना देखील दोघांची जोडी आवडते. जान्हवीचे वडील यांनी देखील शिखर – जान्हवी यांच्या नात्याला होकार दिला आहे.
View this post on Instagram
जान्हवी हिने बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये देखील शिखर याच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. चाहते आता दोघांना लग्न कधी करणार असा प्रश्न विचारत आहेत. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील केलं जातं.
View this post on Instagram
जान्हवीच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच “सनी संस्कारी की तुलसी कुमारी” सिनेमातून चाहत्यांत्या भेटीस येणार आहे. सिनेमात जान्हवी अभिनेता वरुण धवन याच्यासोबत दिसणार आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
