जावेद अख्तर यांनी शत्रुघ्न सिन्हाला घरी ठेवण्यास दिला होता नकार, नेमकं काय झालं? वाचा
बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, त्यांनी अनेक वर्षांपूर्वी फक्त ६० रुपयांमुळे शत्रुघ्न सिन्हा यांना आपल्या खोलीत राहू दिले नव्हते.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांनी मुंबईत येऊन काम मिळवण्यासाठी आणि स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी खूप संघर्ष केला. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर हे त्यापैकी एक आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला आहे. आता ते नेमकं काय म्हणाले चला जाणून घेऊया…
जावेद अख्तर यांचा मुंबईतील संघर्ष
जावेद अख्तर १९६० च्या दशकात मुंबईत परतले आणि इंडस्ट्रीत आपली जागा निर्माण करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम केले. त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आज जावेद अख्तर बॉलिवूडमधील दिग्गजांपैकी एक मानले जातात. ‘१९४२: अ लव्ह स्टोरी’मधील ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’, ‘ओम शांति ओम’मधील ‘मैं अगर कहूं’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मधील ‘दिल धड़कने दो’, ‘वेक अप सिड’मधील ‘इकतारा’, ‘कभी अलविदा ना कहना’मधील ‘तुम ही देखो ना’ ही जावेद यांच्या काही उल्लेखनीय कामांपैकी आहेत. वाचा: बाथटबमध्ये उतरली २५ वर्षीय अभिनेत्री, बिना कपडे हिरोसोबत दिसली; इंटरनेटवर खळबळ
भाड्याच्या खोलीत राहायचे जावेद अख्तर
पण तुम्हाला माहिती आहे का, जावेद अख्तर एकेकाळी एका छोट्याशा खोलीत राहायचे, ज्याचे भाडे फक्त १२० रुपये होते? या खोलीत ते दुसऱ्या एका व्यक्तीसोबत राहायचे. मिड-डे या वृत्तानुसार नुकत्याच एका मुलाखतीत, जावेद यांनी त्या काळाची आठवण सांगितली जेव्हा ते एका व्यक्तीसोबत खोली शेअर करायचे. त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना आपल्या भाड्याच्या खोलीत राहण्यास नकार दिला होता.
खोलीचे भाडे किती होते?
इतर सेलिब्रिटींप्रमाणेच जावेद यांनाही इंडस्ट्रीत संघर्ष करावा लागला. छोटी-मोठी कामे करण्यापासून ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यापर्यंत, या दिग्गज गीतकाराने १९७० मध्ये सिप्पी फिल्म्समध्ये लेखक म्हणून नोकरी मिळवली. या नोकरीतून त्यांना महिन्याला फक्त १७५ रुपये मिळायचे. एक काळ असा होता की, जावेद एका छोट्या खोलीत दुसऱ्या व्यक्तीसोबत राहायचे, ज्याचे एकूण भाडे १२० रुपये होते. मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत जावेद यांनी सांगितले की, शत्रुघ्न सिन्हा यांनी एकदा त्यांच्याकडे खोलीत राहायला घेण्याची विनंती केली होती. जावेद यांनी मजेत त्यांचा प्रस्ताव नाकारला आणि सांगितले की, ते ६० रुपये भाडे देऊ शकणार नाहीत.
शत्रुघ्न सिन्हा यांना दिला होता नकार
जावेद म्हणाले, “मला एक खोली मिळाली होती… जेव्हा मी थोडा स्थिरस्थावर झालो, तेव्हा तिचे भाडे १२० रुपये महिना होते… ६० रुपये मी द्यायचो आणि ६० रुपये दुसरा कोणीतरी. तेव्हा शत्रु (शत्रुघ्न सिन्हा) माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘तू मला तुझ्या खोलीत ठेव.’ मी म्हणालो, ‘वेडा आहेस का? तू मलाही बाहेर काढशील. ६० रुपये महिना तू कुठून आणणार? दरमहा ६० रुपये तुला देता येतील का?'”
