AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jawan Box Office | बॉक्स ऑफिसवर ‘जवान’चं वादळ; पहिल्याच दिवशी मोडला ‘पठाण’, ‘गदर’चा विक्रम

शाहरुख खान पुन्हा एकदा बॉलिवूडचा 'किंग' ठरला आहे. 'जवान' या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे. 'जवान'च्या जबरदस्त कमाईद्वार शाहरुखने स्वत:च्याच 'पठाण' चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.

Jawan Box Office | बॉक्स ऑफिसवर 'जवान'चं वादळ; पहिल्याच दिवशी मोडला 'पठाण', 'गदर'चा विक्रम
JawanImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 08, 2023 | 8:02 AM
Share

मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : एकाच वर्षात दोन ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा बॉलिवूडचा ‘किंग’ ठरला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने ‘पठाण’ या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केलं. त्यानंतर आता काही महिन्यांनी प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. शाहरुखने या चित्रपटाद्वारे एक नवा विक्रम रचला आहे. गोपाळकालाच्या दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटर्समध्ये चाहत्यांनी तुफान गर्दी केली. त्यामुळे पहिल्या दिवसाची कमाई किती होईल याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. आता हे आकडे समोर आले आहेत. ‘जवान’च्या कमाईसमोर ‘पठाण’ आणि ‘गदर 2’ फिके पडले आहेत.

‘जवान’ची पहिल्या दिवसाची कमाई

मिळालेल्या माहितीनुसार ‘जवान’ने गुरूवारी 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी देशभरात तब्बल 75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सर्व भाषांमध्ये मिळून इतकी कमाई झाली आहे. फक्त हिंदी भाषेबद्दल बोलायचं झाल्यास शाहरुखच्या ‘जवान’ने 63 ते 65 कोटी रुपये कमावले आहेत. तर तमिळ आणि तेलुगू भाषेत पाच-पाच कोटी रुपयांची कमाई झाली आहे. म्हणजेच दक्षिण भारतातही शाहरुखच्या ‘जवान’ची क्रेझ पहायला मिळत आहे. शाहरुखने स्वत:च्याच चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. ‘पठाण’ने पहिल्या दिवशी 55 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘जवान’ हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

‘जवान’ ऑनलाइन लीक

प्रदर्शनाच्या काही तासांतच ‘जवान’ हा चित्रपट एचडी प्रिंटमध्ये ऑनलाइन लीक झाला. हा चित्रपट तमिळ रॉकर्स, एमपी फोर मुव्हीज, वेगा मूव्हीज आणि फिल्मीझिला या साइट्सवर फुल एचडी प्रिंटमध्ये मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध करण्यात आला. चित्रपट लीक झाल्यामुळे निर्मातांना कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

जवान या चित्रपटात शाहरुख खानसोबतच दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही मुख्य भूमिका आहे. त्यासोबतच सान्या मल्होत्रा, दीपिका पादुकोण, प्रियामणी, सुनील ग्रोवर हे सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा प्रसिद्ध दिग्दर्शक अटलीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.