अमिताभ बच्चन यांच्याशी फक्त या एका गोष्टीमुळे लग्न केलं; जया बच्चन यांनी स्पष्टच सांगितलं
जया बच्चन यांनी अलीकडेच अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न करण्यामागचे खास कारण उघड केले आहे. त्यांच्या मते, अमिताभ बच्चन यांच्यातील एक अशी गोष्ट आहे जी नेहमीच त्यांना आकर्षित करते. तसेच ते नेहमी पापाराझींवर का रागवलेले असतात? याबद्दलही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

जया बच्चन यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात त्यांचे पती अमिताभ बच्चन यांचे कौतुक केले, त्यांच्या शिस्त आणि व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी स्पष्ट केले की अमिताभ त्यांचे मत उघडपणे व्यक्त करत नाहीत, तर ती स्वतः स्पष्टवक्ती आहे.
एक कार्यक्रमात जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल स्पष्ट सांगितले
जया बच्चन नेहमी त्यांच्या स्पष्टवक्त्या स्वभावामुळे आणि त्यांच्या रागीट स्वभावामुळे कायम चर्चेत असतात. त्यांचे आणि पापराझींचे वाद किंवा सेल्फी काढायला आलेल्या चाहत्यांसोबतचे वाद नेहमीच चर्चेत असतात. अलिकडेच त्यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. ज्यात त्यांचे पापाराझींसोबतचे त्यांचे नाते, तसेच तिची नात नव्या नंदाचे लग्न आणि अमिताभ बच्चन यांच्या गुणांबद्दल चर्चा केली. त्यांनी स्पष्ट केलं की बिग बींचे व्यक्तिमत्व त्यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. कदाचित म्हणूनच त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केलं असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं.
जया बच्चन यांनी अमिताभ यांच्याबदद्ल काय सांगितले?
जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्या स्वभावाबद्दल सांगताना म्हटले की, अमिताभ त्यांचे मत कधीच उघडपणे व्यक्त करत नाहीत. ते त्यांचे मत स्वतःपुरतेच ठेवतात. तर जया बच्चन त्यांचे विचार स्पष्टपणे व्यक्त करण्यास प्राधान्य देतात, तर त्यांनी स्वतः कबूल केले की त्या त्यांचे विचार उघडपणे व्यक्त करतात.
म्हणून जया बच्चन यांनी अमिताभ यांच्याशी लग्न केले.
जया अमिताभबद्दल म्हणाल्या “मला त्यांची शिस्त सर्वात जास्त आवडते. मला स्वतःला शिस्तबद्ध राहायला आवडते. मी खूप कडक आई आहे. अमिताभ जास्त बोलत नाही. तो माझ्याइतके उघडपणे आपले मत व्यक्त करत नाही. पण त्यांना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने आपले विचार कसे व्यक्त करायचे हे माहित आहे. तेच मी करू शकत नाही. हाच फरक आहे. हेच त्यांचे व्यक्तिमत्व आहे. कदाचित म्हणूनच मी त्याच्याशी लग्न केले. कारण आहे त्यांचा स्वभाव”
View this post on Instagram
त्यानंतर मग जया गमतीने म्हणाल्या, “कल्पना करा जर मी माझ्यासारख्या व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तीशी लग्न केले असते तर काय झाले असते? कदाचित अशा परिस्थितीत ते एकिकडे असते आणि मी दुसरीकडे कुठेतरी असते.” अमिताभ आणि जया यांचे लग्न 3 जून 1973 रोजी झाले. त्यांनी या वर्षी जूनमध्ये त्यांचा 52 वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला.
जया बच्चन पॅप्सवर का रागावतात?
जया पॅप्सवर का रागवतात याबद्दल त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या ” माझे मीडियाशी संबंध खूप चांगले आहेत. मी मीडियासाठीचा नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहे. पण माझे पॅप्सशी संबंध शून्य आहेत. हे लोक कोण आहेत? त्यांनी काही प्रशिक्षण घेतले आहे का? तुम्ही त्यांना मीडिया म्हणता. मी मीडियामधून आलो आहे. माझे वडील पत्रकार होते. मला अशा लोकांबद्दल आदर आहे. पण बाहेर टाईट पँट घालून, हातात मोबाईल घेऊन उभे असलेले हे लोक असे मानतात की त्यांच्याकडे मोबाईल असल्याने ते तुमचा फोटो काढू शकतात. ते कोणत्या प्रकारच्या कमेंट्स करतात. हे कोणत्या प्रकारचे लोक आहेत? ते कुठून आले आहेत? त्यांचे शिक्षण काय आहे? त्यांची पार्श्वभूमी काय आहे?” असे प्रश्न उपस्थित करत जया बच्चन यांनी पापाराझींवर रागवण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.
