“तुम्हाला लाज नाही वाटत का?”, चाहत्यांवर का भडकल्या जया बच्चन?

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Oct 05, 2022 | 4:25 PM

जया बच्चन यांचा राग अनावर; चाहत्यांवर व्यक्त केला संताप

तुम्हाला लाज नाही वाटत का?, चाहत्यांवर का भडकल्या जया बच्चन?
Jaya Bachchan
Image Credit source: Twitter

मुंबई- अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) नेहमीच त्यांच्या बेधडक स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्यांचा तापट स्वभाव ओळखून अनेकदा फोटोग्राफर आणि कॅमेरामनसुद्धा चार हात लांबच राहतात. नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगात जया बच्चन पुन्हा एकदा चाहत्यांवर ओरडताना दिसल्या. विजयादशमीनिमित्त त्या अभिषेक बच्चनसोबत (Abhishek Bachchan) भोपाळमधील प्रसिद्ध काली बरी मंदिरात देवदर्शनासाठी गेल्या होत्या. या मंदिरातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये जया बच्चन चाहत्यांवर भडकताना पहायला मिळत आहेत.

जया बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना पाहून चाहत्यांनी फोटो आणि सेल्फीसाठी त्यांच्याभोवती गराडा केली. यावेळी अभिषेकने चाहत्यांसोबत शांतपणे फोटो आणि सेल्फी काढले. मात्र चाहत्यांचा घोळका पाहून जया बच्चन यांचा पारा चढला.

“डोळ्यांवर मोबाइलचा खूप प्रकाश पडतोय. तुम्ही काय करत आहात? लाज नाही वाटत का तुम्हाला”, अशा शब्दांत त्या चाहत्यांना ओरडतात. त्यानंतर चाहते घाबरून मागे हटतात. याआधीही जया बच्चन यांना कॅमेरासमोर राग अनावर झाल्याचं पहायला मिळालं.

काही दिवसांपूर्वीच त्यांना एअरपोर्टवर पाहिलं गेलं. तेव्हासुद्धा पापाराझींवर त्या भडकल्या होत्या. जया बच्चन यांना फोटो काढलेला अजिबात आवडत नाही, हे यावरून स्पष्ट होतंय. त्या लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकणार आहेत. यामध्ये आलिया भट्ट, रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत.

हे सुद्धा वाचा

जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन काही महिन्यांपूर्वी ‘दसवी’ या चित्रपटात झळकला. तर त्यांची सून ऐश्वर्या रायचा ‘पोन्नियिन सेल्वन 1’ हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. ऐश्वर्याच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI