पॉडकास्टमध्ये जया बच्चन लेक श्वेतावर भडकल्या, म्हणाल्या ‘तूच एकटीच आहेस का, सतत काय मी..मी..”
पॉडकास्टमध्ये जया बच्चन या त्यांची लेक श्वेतावर चिडलेल्या दिसल्या. काही मुद्द्यांवरून त्यांनी लेकीला झापलेलं दिसलं. "सतत मी, मी का करत असते? कधीतरी समोरच्याचही ऐकून घ्यावं" असं म्हणत त्यांनी झापलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बच्चन कुटुंब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. त्यांच्या अभिनय कारकिर्दीव्यतिरिक्त, बच्चन कुटुंबातील सदस्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत असते. सध्या जया बच्चनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती त्यांची मुलगी श्वेता बच्चनवर चिडताना दिसली आहे.
जया बच्चन लेक श्वेता बच्चनवर चिडलेल्या दिसल्या.
खरंतर, नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्ट ‘व्हॉट द हेल नव्या’च्या एका एपिसोडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जया बच्चन आणि श्वेता यांनी पुन्हा एकदा तिच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या अनफिल्टर पॉडकास्टमध्ये, तिघेही बऱ्याच मुद्द्यावर आपले मत देताना दिसले. याच पॉडकास्टमध्ये जया बच्चन लेक श्वेता बच्चनवर चिडलेल्या दिसल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.पॉडकास्टमध्ये नव्याने तिच्या आई आणि आजीला एक प्रश्न विचारला की, “इंटरनेटचा मानव म्हणून आपल्यावर काय परिणाम झाला आहे? तुम्हाला वाटते का की आपण पूर्वीपेक्षा दयाळू झालो आहोत? तुम्हाला वाटते का की आपण आशावादी झालो आहोत?”
सतत मत देत असते
जया बच्चन उत्तर देण्यापूर्वीच श्वेता म्हणाली, “जे लोक नैसर्गिकरित्या दयाळूपणा असतो ते अधिक दयाळू असतात. जे लोक नैसर्गिकरित्या कडू असतात ते कडू असतात आणि वाईट लोक वाईट असतात. हा सामान्यतः मानवी स्वभाव आहे.” श्वेताचे हे वाक्य ऐकून जया बच्चन चिडल्या आणि त्यांनी श्वेताला फटकारलं. त्या म्हणाल्या “श्वेता, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. तूच एकमेव आहेस जी सतत मत देत असते आणि सतत मध्ये मध्ये बोलत असते.”
Why watch Keeping Up With The Kardashians when you can keep with the Bachchans. byu/Slow-Fold-5706 inBollyBlindsNGossip
फक्त मी, मी आणि मी ….
त्यावर जेव्हा श्वेता बच्चन म्हणाली की हा पॉडकास्ट देखील मते देण्यासाठी आहे, तेव्हा जया म्हणाल्या, “हो, ही चांगली गोष्ट आहे, पण ती फक्त मी, मी आणि मी नाही. कधीकधी तुम्हाला फक्त बसून समोरच्याच ऐकावंही लागतं.” आईला चिडलेलं पाहून श्वेता नंतर गप्प झालेली दिसली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
