AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप्पा श्राप देतायत असं वाटतंय..; जयवंत वाडकर संतापले, लालबागचा राजाच्या विसर्जनाबद्दल स्पष्टच बोलले..

जयवंत वाडकर यांच्या या वक्तव्यामुळे गणेशोत्सवातील बदल, विसर्जनाची पद्धत आणि मूर्तींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. गणेश मंडळं आणि प्रशासनाने एकत्र बसून या विषयावर चर्चा करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

बाप्पा श्राप देतायत असं वाटतंय..; जयवंत वाडकर संतापले, लालबागचा राजाच्या विसर्जनाबद्दल स्पष्टच बोलले..
jaywant wadkar Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 22, 2026 | 1:21 PM
Share

Lalbaughcha Raja: मुंबईचा गणेशोत्सव म्हटलं की भव्यता, श्रद्धा आणि उत्साहाचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. मात्र यंदाच्या गणेशोत्सवात काही गणेशमूर्ती कोसळल्याच्या घटनांनी चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. गणेशमूर्ती कोसळण्याच्या घटनांबाबत बोलताना त्यांनी, ‘गणपती बाप्पा आपल्याला श्राप देतायत असं वाटतंय,’ अशी भावना व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. खासगी वृत्तवाहिनीला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जयवंत वाडकर यांनी यंदाच्या गणेशोत्सवातील काही घटनांवर भाष्य केलं. यावर्षी जवळपास अकरा ते बारा गणेशमूर्ती विविध अपघातांमध्ये कोसळल्या. या घटनांचा उल्लेख करत त्यांनी पूर्वीच्या गणेशोत्सवातील पद्धती आणि आताच्या बदललेल्या व्यवस्थेबाबतही स्पष्ट भूमिका मांडली.

“लालबागच्या राजाचं विसर्जन आम्ही कोळी लोक करायचो”

जयवंत वाडकर यांनी लालबागचा राजा आणि त्याच्या विसर्जनाशी संबंधित जुन्या आठवणीही सांगितल्या. पूर्वी लालबागच्या राजाचं विसर्जन कोळी समाजातील लोक एकत्र येऊन करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र आता विसर्जनासाठी हायड्रॉलिक ट्रॉलीसारख्या आधुनिक यंत्रणांचा वापर होत असल्याचं ते म्हणाले. या बदलाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनाच्या व्यवस्थेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. “लालबागचा राजाचं विसर्जन आम्ही कोळी लोक एकत्र मिळून करायचो. आता हायट्रॉलिक ट्रॉलिचं रुप आलं आहे. यावर्षी जवळपास 11 ते 12 गणेशमूर्ती अपघातांमध्ये कोसळले आहेत. गणपती बाप्पा आपल्याला श्राप देत आहेत, असंच वाटतंय. माझी सर्व मंडळांना आणि शासनाकडे एवढीच विनंती आहे की कृपया यावर चर्चा करा आणि तोडगा काढा. मधला दुवा काढणं खूप गरजेचं आहे”, असं ते म्हणाले.

‘सगळीकडे राजे झाले आहेत… स्पर्धा थांबली पाहिजे’

जयवंत वाडकर यांनी गणेशोत्सवाच्या वाढत्या भव्यतेवरही भाष्य केलं. पूर्वी लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा राजा अशी काही प्रमुख नावं असायची, मात्र आता विविध भागांमध्ये ‘राजा’ नावाच्या गणेशमूर्तींची संख्या वाढल्याचं त्यांनी म्हटलं. अगदी छोट्या गल्ल्या आणि सोसायट्यांमध्येही ‘राजा’ नावाचे फलक पाहायला मिळतात, असं ते म्हणाले. गणेशोत्सवात निर्माण झालेली ही स्पर्धा थांबायला हवी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश आनंद साजरा करणं आणि लोकांना एकत्र आणणं हा आहे. त्यामुळे या उत्सवाचं सांस्कृतिक महत्त्व आणि परंपरा जपण्यावर भर दिला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना मोठी हाक
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची...
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची शक्यता
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क..
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85 रुग्णवाहिका, 34 क्रेन अन्...
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकरी संकटात
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकऱ्याची व्यथा ऐकून डोळे पाणावतील
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत राऊत...
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत संजय राऊतांचं विधान
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप...
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर... नेमकं काय घडलं?
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार