पैशांसाठी म्हाताऱ्याशी लग्न केलं; जुही चावलाची उडवली होती खिल्ली, सत्य जाणून तुम्हीही व्हाल भावूक!

अभिनेत्री जुही चावलाने करिअरच्या शिखरावर असताना बिझनेसमन जय मेहताशी लग्न केलं. हे लग्न तिने काही काळापर्यंत सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. मात्र जेव्हा लोकांना तिच्या लग्नाविषयी समजलं, तेव्हा अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

पैशांसाठी म्हाताऱ्याशी लग्न केलं; जुही चावलाची उडवली होती खिल्ली, सत्य जाणून तुम्हीही व्हाल भावूक!
Juhi Chawla with husband Jay MehtaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 9:32 AM

अभिनेत्री जुही चावलाने तिच्या आजवरच्या करिअरमध्ये अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केलंय. 1984 मध्ये ‘मिस इंडिया’चा किताब जिंकलेल्या जुहीने बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष राज्य केलं. आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यांच्यासोबतची तिची जोडी विशेष हिट झाली होती. 1986 मध्ये तिने ‘सल्तनत’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. जुही नेहमी वादापासून दूरच राहण्याचा प्रयत्न करते. मात्र लग्नामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. दमदार अभिनय आणि सौंदर्य यांमुळे इंडस्ट्रीत जुहीवर अनेकजण फिदा होते. 1988 मध्ये ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट जबरदस्त हिट झाल्यानंतर जुहीने मागे वळून पाहिलंच नाही. मात्र करिअरच्या शिखरावर असतानाच तिने तिच्यापेक्षा सात वर्षांनी मोठ्या असलेल्या बिझनेसमन जय मेहताशी लग्न केलं.

जय मेहता जेव्हा पहिल्यांदा जुहीला भेटले होते, तेव्हा त्यांची पत्नी सुजाता बिर्ला यांचं एका प्लेन क्रॅशमध्ये निधन झालं होतं. 1992 मध्ये ‘कारोबार’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी जुही आणि जय यांची भेट घडवून आणली होती. राकेश आणि जय हे खूप चांगले मित्र आहेत. शूटिंगदरम्यान दोघांची अनेकदा भेट झाली होती. जुहीला जेव्हा जय मेहता यांच्या पत्नीच्या निधनाबद्दल समजलं, तेव्हा तिने सहानुभूती दर्शवली. त्याच काळात दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. या दोघांनी जेव्हा लग्नाचा विचार केला तेव्हा जुहीच्या आईचं एका कार अपघातात निधन झालं. या घटनेमुळे जुही पूर्णपणे खचली होती. या दु:खातून बाहेर पडण्यात जय यांनी जुहीची खूप मदत केली. अखेर 1995 मध्ये दोघांनी लग्न केलं. या दोघांना जान्हवी ही मुलगी आणि अर्जुन हा मुलगा आहे.

हे सुद्धा वाचा

जुहीने काही वर्षांपर्यंत तिचं लग्न लपवून ठेवलं होतं. करिअरवर कोणताही प्रभाव पडू नये म्हणून तिने लग्नाचा खुलासा केला नव्हता. जुही चावला ही जय मेहता यांची दुसरी पत्नी आहे. जय मेहता हे मेहता ग्रुपचे मालक आणि प्रसिद्ध बिझनेसमन आहेत. जुहीच्या लग्नाबद्दल जेव्हा लोकांना समजलं, तेव्हा अनेकांनी तिची खिल्ली उडवली होती. पैशांसाठी तिने म्हाताऱ्याशी लग्न केलं, असे टोमणेही मारले गेले.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.