माझ्यावर हसणारे आता रडतायत, कंगना रनौतचा निशाणा नेमका कुणावर?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते.

माझ्यावर हसणारे आता रडतायत, कंगना रनौतचा निशाणा नेमका कुणावर?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती प्रत्येक विषयावर आपले मत देण्यास मागे पुढे पाहत नाही, ज्यामुळे कंगना बऱ्याचवेळा वादात देखील अडकते. नुकताच कंगनाने एक ट्विट शेअर करुन सांगितले की, जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आले होते तेव्हा प्रत्येकजण माझी चेष्टा करत होते. पण आता माझे यश पाहून ते लोक रडत आहेत. (Kangana Ranaut again targeted those people in the film industry)

कंगनाने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मी जेंव्हा इंडस्ट्रीत आले तेव्हा प्रत्येकजण माझ्यावर हसत होता. माझ्या बोलण्याची पद्धत, माझे केस, माझे कपडे आणि माझ्या इंग्रजीवर हे सर्व लोक हसायचे. मात्र आता ते सर्व लोक रडत आहे आणि मी हसत आहे हा हा हा…

कंगनाला आता तिच्या ट्विटर अकाउंटवर 30 लाख लोक फॉलो करत आहेत. कंगनाच्या सतत ट्विटमुळे तिचे अकाउंट चर्चेत राहते. 30 लाख लोक फॉलो करत असल्यचे स्वत : कंगनाने सांगितले आहे आणि यूजर्सचे आभार मानले आहेत. कंगनाने याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे आणि लिहिले आहे की, मी ऑगस्टमध्ये ट्विटरवर आले होते. काही दिवसांपूर्वी मला फॉलो करणारे फक्त हजारांमध्ये होते मात्र, आता ते 30 लाख झाले आहेत. मी ट्विटरवर बराच वेळ घालवला आहे आणि तो मजेदार आहे, सर्वांचे आभार

अलीकडेच दिलजीतने आपल्या सुट्टीचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते, ज्यावर कंगनाने टाकले होते व्वा भावा देशामध्ये आग लावलीस आणि आता सुट्ट्यांचा आनंद घेतोस. याला म्हणतात लोकल क्रांतिकारी, अशा शब्दात कंगनाने दिलजीतवर प्रहार केला होता. त्यावर दिलजीतने उत्तर दिले होते की, तुला तुझ्याबद्दल खूप गैरसमज आहे आणि तु काय केले आहे ते आम्ही पंजाबी लोक विसरलो नाहीत लवकरच आम्ही तुला उत्तर देणार आहोत.

संबंधित बातम्या : 

‘Thank God’ या कॉमेडी चित्रपटात अजय, सिद्धार्थ आणि रकुल करणार काम!

Bachchan Pandey | राउडी गँगस्टर अक्षयचा लुक बघून चाहते अचंबित, नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात!

(Kangana Ranaut again targeted those people in the film industry)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI