Kangana Ranaut | मोठ्या ब्रेकनंतर कंगना पुन्हा सेटवर, ‘थलायवी’च्या चित्रीकरणाला सुरुवात

कोरोना लॉकडाऊनमध्ये मनालीच्या घरी सुट्टी एन्जॉय करणाऱ्या कंगनाने (Kangana Ranaut) चित्रीकरणासाठी सेटवर परतत असल्याची बातमी ट्विटरद्वारे आपल्या चाह्त्यांसोबत शेअर केली आहे.

Kangana Ranaut | मोठ्या ब्रेकनंतर कंगना पुन्हा सेटवर, ‘थलायवी’च्या चित्रीकरणाला सुरुवात
Follow us
| Updated on: Oct 01, 2020 | 7:03 PM

मुंबई : कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण (Shooting) रखडले होते. कलाकारदेखील कोरोनाच्या भीतीने चित्रीकरण टाळत होते. मात्र, आता अनलॉक सुरू झाल्यांनतर परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत असून अनेक कलाकारांनी चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. अभिनेत्री कंगना रनौतदेखील (Kangana Ranaut) सात महिन्यांच्या ब्रेकनंतर ‘थलायावी’च्या (Thalaivi) सेटवर परतली आहे (Kangana Ranaut returned on thalaivi  set for shooting).

लॉकडाऊनमध्ये मनालीच्या घरी सुट्टी एन्जॉय करणाऱ्या कंगनाने (Kangana Ranaut) चित्रीकरणासाठी सेटवर परतत असल्याची बातमी ट्विटरद्वारे आपल्या चाह्त्यांसोबत शेअर केली आहे. ‘प्रिय मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे, 7 महिन्यांनंतर पुन्हा काम करणार आहे, माझा मोठा प्रोजेक्ट ‘थलायवी’साठी (Thalaivi) दक्षिण भारतात जात आहे. महामारीच्या काळात तुमच्या प्रार्थनांची आवश्यकता आहे. मी काही सेल्फी शेअर करत आहे, आशा आहे की तुम्हाला आवडतील’, असे ट्विट करत कंगनाने (Kangana Ranaut) काही खास फोटो शेअर केले आहेत.

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवन कथेवर चित्रपट

‘थलायवी’ (Thalaivi) हा चित्रपट तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना जयललितांच्या भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी कंगनाने तब्बल 20 किलो वजन वाढवले होते. (Kangana Ranaut returned on thalaivi  set for shooting)

कोरोनामुळे प्रदर्शन लांबणीवर

ए.एल. विजय दिग्दर्शित ‘थलायवी’ हा चित्रपट 26 जून 2020ला प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे जनजीवन ठप्प झाल्याने, चित्रपटाचे चित्रीकरण (Shooting) वेळेवर पूर्ण होऊ शकले नाही. या चित्रपटाचे काही चित्रीकरण अद्याप बाकी आहे. तब्बल 7 महिन्यांनंतर आता चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. चित्रीकरण संपल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, असे म्हटले जात होते. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट डिजिटली प्रदर्शित होणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता चित्रपटगृह सुरू होईपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहायला लागणार आहे.(Kangana Ranaut returned on thalaivi  set for shooting)

कंगनाच्या आणखी दोन चित्रपटांची प्रतीक्षा

राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर कंगनाने ‘अपराजित अयोध्या’ या चित्रपटाची घोषणा केली होती. कंगना स्वतः या चित्रपटाची निर्मिती करणार असून, दिग्दर्शनही सांभाळणार आहे. अयोध्येच्या राम मंदिरावर आधारित हा चित्रपट असणार आहे. याशिवाय ‘तेजस’ या आगामी चित्रपटात कंगना (Kangana Ranaut) हवाईदलातील अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. तिने या चित्रपटातील तिच्या लूकचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले होते.

(Kangana Ranaut returned on thalaivi  set for shooting)

संबंधित बातम्या : 

Kangana Ranaut | मी वाद सुरु करत नाही, संपवते : कंगना रनौत

उर्मिला मातोंडकर अभिनयासाठी नाही सॉफ्ट पॉर्नसाठी परिचित” कंगनाची जीभ घसरली

मी क्षत्रीय, शीर धडावेगळं झालं तरी चालेल, पण ते कधीही झुकणार नाही : कंगना रनौत

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.