AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut : स्त्री म्हणून म्हणणं मांडायला शिका, कोणीही तुम्हाला.. ‘पेद्दी’मधील जान्हवीच्या त्या सीन्सवरून कंगना रानौत यांनी सुनावलं

चित्रपटात अभिनेत्रींना गरजे पेक्षा जास्त, ओव्हर- सेक्शुअलाइज दाखवण्यावर कंगना रानौत यांनी कमेंट केली आहे. अभिनेत्रींना स्वत:लाच ठाम भूमिका घ्यावी लागणार आहेय. पेद्दी चिकत्रपटातील जान्हवी कपूरच्या सीन्सवरून गदारोळ सुरू असतानाच कंगना रानौत म्हणाल्या..

Kangana Ranaut : स्त्री म्हणून म्हणणं मांडायला शिका, कोणीही तुम्हाला.. 'पेद्दी'मधील जान्हवीच्या त्या सीन्सवरून कंगना रानौत यांनी सुनावलं
पेद्दीवरील वादावरून कंगना रानौत काय म्हणाल्या ?
| Updated on: Jun 09, 2026 | 8:38 AM
Share

चित्रपटसृष्टीत सध्या नायिकांना ओव्हर-सेक्शुअलाइज करून दाखवण्यातबाबाच जोरदार चर्चा, वाद सुरू आहेत. अभिनेतै राम चरणच्या ‘पेद्दी’ (Peddi) या चित्रपटात जान्हवी कपूरचेही असेच, ओव्हर-सेक्शअलाइज शूटिंग करण्यात आल्यामुळे हा वाद अधिकच तीव्र झाला. या मुद्द्यावर अनेक आघाडीच्या अभिनेत्रींनी आपापली मतं मांडली आहेत. नुकतंच ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या मुद्यावरून बोलल्या होत्या. तर आता, अभिनेत्री आणि मंडीच्या खासदार कंगना रानौत यांनीही चित्रपटांमधील नायिकांच्या अति-लैंगिक सादरीकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

कंगना रानौत सध्या त्यांच्या ‘भारत भाग्य विधाता’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याचदरम्यान एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी या मुद्यावरही भाष्य केलं. चित्रपटांमधील जी पात्र असतात, त्यांचे ‘वस्तूकरण’ (objectification) टाळण्यासाठी काय करता येईल? असा सवाल त्यांना विचारण्यात आला असता कंगना यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले.

चित्रपटातील objectification वर काय म्हणाल्या कंगना रानौत ?

“माझ्या अनुभवानुसार, सहसा असं घडतं की जेव्हा मी एखादा चित्रपट करण्याचा निर्णय घेते, तेव्हा अनेक वेगवेगळे दृष्टिकोन समोर येतात. तुम्ही त्यातील एखादा पैलू घेऊन असं म्हणू शकता की, ‘हे काहीसं तसंच (objectification केल्यासारखं) वाटतंय.’ खरं सागायचं तर लोकं काही मुद्दाम एखाद्या व्यक्तीचं चित्रण विशिष्ट पद्धतीने करू पाहत नाहीत. ‘चला, या व्यक्तीला केवळ एक वस्तू म्हणून सादर करूया,’ असा विचार करून कोणताही चित्रपटनिर्माता कामाला सुरुवात करत नाही.” असं कंगना म्हणाल्या.

‘माझ्या अनुभवानुसार, लोक तसा विचार करत नाहीत. एक स्त्री म्हणून तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता. “याबाबत मला असं वाटते,” किंवा “हे मला योग्य वाटत नाही.” असं तुम्ही सांगू शकता ना. आणि बहुतेक वेळा, सगळेजण त्याशी ( त्या म्हणण्याशी) सहमत होतात. ते म्हणतात, “अरे, आम्ही तर या दृष्टीने विचारच केला नव्हता; पुरुषाच्या दृष्टिकोनातून लिहिताना आम्हाला त्यात काहीच चुकीचे वाटले नव्हतं.” त्यामुळे, अशा अशा गोष्टी घडतात. जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटावर काम करत असता, तेव्हा तो एक सामूहिक प्रयत्न असतो—ती एक भागीदारी असते.’ अस म्हणत कंगना यांनी स्त्रियांना आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडण्याचा सल्ला दिला.

जान्हवीच्या वादावरून मेकर्सचं म्हणणं काय ?

चित्रपटातील जान्हवी कपूरच्या दृश्यांवरून निर्माण झालेल्या झालेला वाद वाढतानाच दिसत आहे. त्यादामुळे, चित्रपटातील तिच्या दृश्यांमध्ये बदल करण्यात येतील असं ‘पेद्दी’ (Peddi) या चित्रपटाचे दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी स्पष्ट केलं. कोणत्याही महिलेचा अनादर करण्याचा आपला उद्देश नव्हता, असंही त्यांनी म्हटलंय. जान्हवीच्या दृश्यांमुळे जे नाराज झालेत, त्या सर्वांची दिग्दर्शकाने माफी मागितली आहे; मात्र, यावर जान्हवीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे