शेतकरी आंदोलनाचा विरोध करणं कंगनाला महागात, 6 ब्रॅंडने रद्द केली कॉन्ट्रॅक्ट!

देशाची राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलकांनी ट्रॅक्टर मार्च आयोजित केला.

शेतकरी आंदोलनाचा विरोध करणं कंगनाला महागात, 6 ब्रॅंडने रद्द केली कॉन्ट्रॅक्ट!

मुंबई : देशाची राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलकांनी ट्रॅक्टर मार्च आयोजित केला. मात्र, एका ठिकाणी हा ट्रॅक्टर मार्च हिंसक झाला. दिल्ली सीमेवरील आयटीओ येथे हे आंदोलन हिंसक झालं. या ठिकाणच्या काही आंदोलकांनी मोर्चाचा मार्ग बदलत थेट लाल किल्ल्यावर चढाई केली. आता या संपूर्ण प्रकरणावर कंगना रनौतने एक ट्विट केलं आहे आणि यामध्ये तिने मोठा खुलासाही केला आहे. (Kangana Ranaut tweeted on the farmers movement)

कंगना म्हणाली जेंव्हा मी या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशदवादी म्हटलं होत त्यावेळेला या शेतकऱ्यांचे समर्थन करत मोठ्या 6 ब्रॅण्डने माझ्यासोबतचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले होते आणि त्या शेतकऱ्यांचे समर्थन केले होते.  त्यांनी मला सांगितले आहे की, तुम्ही शेतकऱ्यांना दहशदवादी म्हटल्यामुळे आम्ही तुम्हाला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवू शकत नाहीत. आता मी त्यांना सांगू इच्छित आहे की, जे आज झालेल्या हिंसेला पाठिंबा देत आहेत ते सुध्दा दहशदवादी आहेत.

कंगना धाकड चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शूटिंग दरम्यान कंगनाला एका आंदोलनाचा सामना करावा लागला होता. भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या. त्याची मागणी होती की, कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे. मात्र, कंगना या आंदोलनाला न घाबरता शूटिंग करत आहे. भोपाळला कंगना धाकडचे अ‍ॅक्शन सीन येथे शूट करत आहे.

कंगनाने नुकताच ए.एल. विजय दिग्दर्शित ‘थलायवी’ या तिच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. थलावली चित्रपट 26 जून 2020ला प्रदर्शित होणार होता. कोरोनामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, असे म्हटले जात होते. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट डिजिटल प्रदर्शित होणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता चित्रपटगृह सुरू होईपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहायला लागणार आहे.

संबंधित बातम्या : 

प्रजासत्ताक दिनादिवशी अक्षय कुमारने लॉन्च केला FAU-G, म्हणतो आजपासून मिशन सुरु…!

सोनू सूदची शपथ ते जॉन अब्राहमचं चाहत्यांना गिफ्ट, बॉलिवडूने असा साजरा केला प्रजासत्ताक दिन…!

(Kangana Ranaut tweeted on the farmers movement)

Published On - 5:13 pm, Tue, 26 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI