सोनू सूदची शपथ ते जॉन अब्राहमचं चाहत्यांना गिफ्ट, बॉलिवडूने असा साजरा केला प्रजासत्ताक दिन…!

सोनू सूदची शपथ ते जॉन अब्राहमचं चाहत्यांना गिफ्ट, बॉलिवडूने असा साजरा केला प्रजासत्ताक दिन...!

आज देशात '72 वा प्रजासत्ताक दिन' उत्साहात साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाचा उत्सव संपूर्ण देशामध्ये सुरू आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jan 26, 2021 | 12:19 PM

मुंबई : आज देशात ‘72 वा प्रजासत्ताक दिन’ उत्साहात साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाचा उत्सव संपूर्ण देशामध्ये सुरू आहे. राजपथावर भारताची विविधता आणि सामर्थ्य दर्शविणारी दृश्ये दाखवले जात आहे तर दुसरीकडे बॉलिवूड सेलिब्रिटी देखील प्रजासत्ताक दिन साजरा करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चनपासून (Amitabh Bachchan) ते सोनू सूदपर्यंत (Sonu Sood) अनेकांनी सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमिता बच्चन यांनी ट्विट करुन खुश, समृद्ध आणि सुरक्षित राहण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

(Republic Day In Bollywood Celebrity Celebrated)

त्याचबरोबर सोनू सूदने या प्रजासत्ताक दिनी लोकांचे जीवन बदलण्याचे वचन देऊन, शुभेच्छा दिल्या आहेत. कंगना रनौतने देखील ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, या प्रजासत्ताक दिनी आपले संविधान जाणून घ्या आणि स्वातंत्र्य कसे मिळाले ते पहा. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने प्रजासत्ताक दिनानिमित्त चाहत्यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. आज जॉन अब्राहमने त्याच्या आगामी चित्रपट सत्यमेव जयते 2 (Satyameva Jayate 2) ची रिलीज तारीख जाहिर केली आहे.

या चित्रपटाचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात आहेत. जॉन अब्राहमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट ईदच्या निमित्ताने 14 मे रोजी रिलीज होईल. यासोबतच मोठी बातमी अशी आहे हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. जॉन अब्राहमने हातात देशाचा झेंडा पकडत पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातलेला फोटो शेअर करत लिहिले आहे की, तन मन धन पेक्षा महत्वाचे जण गण मन, सत्यमेव जयते 2 च्या टिमकडून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! 14 मे ला ईदच्या दिवशी भेटूयात सत्यमेव जयते 2

संबंधित बातम्या : 

Satyamev Jayate 2 | ईदच्या मुहूर्तावर रिलीज होतोय जॉन अब्राहमचा चित्रपट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

‘हाऊज द जोश? हाय सर…’, विकी कौशलचा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

(Republic Day In Bollywood Celebrity Celebrated)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें